विनोद काकडे यांचे निधन

167

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.29डिसेंबर):-चिमूर येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत सहायक लेखापाल पदावर कार्यरत विनोद बाजीराव काकडे यांचे शुक्रवारी (ता. २९) पहाटे ५ वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते.

ब्रह्मपुरी येथील निवासस्थानाहून शुक्रवारी दुपारी त्यांची अंत्ययात्रा निघाली. कुटुंबीय, नातेवाईक आणि गणमान्य नागरिकांच्या उपस्थितीत ब्रह्मपुरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात बराचमोठा आप्तपरिवार आहे. पत्रकार प्रमोद काकडे यांचे ते थोरले बंधू होते.