समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज – भंडारा जि .प .चे अध्यक्ष गंगाधरजी जिभकाटे यांचे प्रतिपादन

144

🔸ब्रह्मपुरी येथे तेली समाज मेळावा संपन्न

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.4जून):- तेली समाज अनेक पोटजातीत विभागलेला असून तत्कालीन व्यवसायानुसार त्या निर्माण झालेल्या होत्या. मात्र सद्यस्थितीत ह्या सर्व पोट जाती तोडून एकाच ठिकाणी आपले सामूहिक कार्यक्रम होण्याची गरज आहे .समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास समाजासोबत राष्ट्राचे विकास होण्यास निश्चित मदत होईल असे प्रतिपादन जिल्हा परिषद भंडाऱ्याचे अध्यक्ष गंगाधर जीभकाटे यांनी केले.

ब्रह्मपुरी येथे संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळ व विदर्भ तेली महासंघ शाखा ब्रह्मपुरी च्या वतीने आयोजित 114 व्या संताजी जयंती उत्सव प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी किसनलाल खोब्रागडे शिक्षण संस्था आरमोरीचे अध्यक्ष भाग्यवानजी खोब्रागडे हे होते तर उद्घाटक म्हणून ब्रह्मपुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष रीताताई उराडे ह्या होत्या.

विशेष सत्कारमूर्ती म्हणून एम्स रुग्णालय नागपूरचे सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ.प्रशांत सावरकर ,प्रमुख अतिथी म्हणून सेवादल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय शेंडे, धनराजजी मुंगले, भरडकर, चंदाताई वैरागडे, डॉ,गोकुळ बालपांडे, नामदेवराव लांजेवार, ठाणेश्वर पाटील कायरकर, इत्यादी उपस्थित होते.

पुढे बोलताना गंगाधर जीभकाटे म्हणाले की , समाजाने शिक्षणाची कास घ्यावी व आपल्या स्वतः सोबतच समाजाची सुद्धा प्रगती साधावी. डॉ. प्रशांत सावरकर यांचा समाजाच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. प्रशांत सावरकर यांनी स्वतःचा जीवन प्रवास उलगडला. समाजातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने यशाची शिखर गाठावी व समाजातील मोठे मोठे माणसांनी समाजासाठी जे देता येईल ते देण्याचा प्रयत्न करावे असेही प्रतिपादन केले. उद्घाटक नगराध्यक्ष रीताताई उराडे यांनी समाजसंघटन वर भर देत एकाच गावात एकाच समाजाचे वेगवेगळे कार्यक्रम न होता एकच कार्यक्रम होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादनही त्यांनी याप्रसंगी केले व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले . . संजय शेंडे ,धनराज मुंगले, प्रा.डॉ,नामदेव वरबे भाग्यवानजी खोब्रागडे, इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले . समाजकार्यासाठीचा पुरस्कार प्रा.नरेंद्र विखार ,सुषमा बाळबुद्धे ,इंजिनीयर राम झाडे ,पत्रकार विलास चिलबुले ,डॉ.खंडाळीत तर वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार डॉ. नंदकिशोर व सरिता खोब्रागडे यांना देण्यात आला.

स्पंदन या वधू वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले .संपादकीय मनोगत राजेंद्र ठोंबरे यांनी मांडले .उप वधू-वर यांनी आप आपला परिचय दिला तसेच ज्येष्ठ नागरिक व समाजासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष डॉ. सतीश कावळे ,पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. रवींद्र विखार तर संचालन जगदीश मेहेर व आभार डॉ. रामेश्वर राखडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रभुदास चिलबुले ,एड.मनीषाताई बंडे, डॉ. मंजुषा साखरकर ,डॉ. परेश सेलोकर भाऊराव कावळे, प्राचार्य सुयोग बाळबुद्धे ,यशवंत कामडी, नथुजी कोल्हे, अरविंद साखरकर ,कळंबे, रेखाताई कावडे,वनिताताई कळंबे, डॉ. अंजली वाडेकर ,अर्चना ताई भोले, सुधाताई बावनकुळे, सर्व कार्यकारिणीचे सन्माननीय सदस्य व समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य केले.