नेवजाबाई कन्या विद्यालय, ब्रम्हपुरी येथे स्नेहसंमेलन संपन्न

440

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.6जानेवारी):-नेवजाबाई हितकारिणी कन्या विद्यालय, ब्रम्हपुरी येथे दि. 3 जानेवारी 2024 ला स्नेहबंध 2024 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांची जयंती बलिका दिन आणि एस एस सी. गुणवंत विद्यार्थीनींचे सत्कार तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड झालेले क्रिडासंघ व विद्यार्थीनींचे पारितोषिक देवून गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अशोक भैय्या साहेब, सचिव ने.हि.भैय्या शिक्षण संस्था ब्रम्हपुरी, सन्माननीय बजाज साहेब सदस्य ने.हि.भैय्या शिक्षण संस्था ब्रम्हपुरी, सन्माननीय मुख्याध्यापिका बनपुरकर मॅडम ,उपमुख्याध्यापक विनोदजी भैय्या सर ,पर्यवेक्षक विजयजी निखारे सर सर्व शिक्षक वृंद कर्मचारीवर्ग, विद्यार्थीनींची उपस्थिती होती .

सन्माननीय अध्यक्ष अशोकजी भैय्या साहेब यांनी विद्यार्थीनींना गुणवत्ते बरोबरच इतर कला गुण विकसीत करा आणि प्रत्येक क्षेत्रात आपले नाव निर्माण करा, अडचणीवर विजय मिळवा आणि सदैव पुढे जात रहा अशाप्रकारे मार्गदर्शन केले.

सन्माननीय बजाज साहेबांनी विद्यार्थीनींना गोष्टी रूपाने यशस्वी कसे व्हावे याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स.मुख्याध्यापिका बनपुरकर यांनी केले.मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.तसेच सन्माननीय अशोकजी भैय्या साहेब यांनी क्रिडा शिक्षक बारेकर व राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार यासाठी गीता सेलोकर मॅडम यांचेही सन्मानचिन्ह व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन शेंडे मॅडम व आभार खंडाते मॅडम यांनी केले.