मानाच्या झेंड्याने श्री सेवागिरी यात्रेस प्रारंभ

131

✒️सातारा-खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

सातारा(दि.6जानेवारी):-जिल्हा खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांचा यंदाचा ७६ वा वार्षिक रथोत्सव सोहळा बुधवार दि. १० जानेवारी रोजी साजरा होणार आहे. या यात्रेचा आज शनिवार रोजी झेंडा मिरवणुकीने प्रारंभ झाला.

श्री. सेवागिरी महाराजांच्या ७६ व्या पुण्यस्मरणानिमित्त दि. ६ ते दि. १६ जानेवारी दरम्यान पुसेगाव येथे वार्षिक यात्रा भरवण्यात येणार असल्याची माहिती मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरीजी महाराज व देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव,विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख व गौरव जाधव यांनी दिली.

दरम्यान आज श्री सेवागिरी महाराजांच्या पादुकांची व मानाच्या झेंडा यांची पूजा करून मनाचा झेंडा यात्रा स्थळावर नेण्यात आला. यावेळी कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.झेंडा मिरवणूक वेळी गावातील सर्व शाळा लेझीम पथके ढोल ताशे गुरुकुल विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती लक्षणीय होती.