पत्रकारांची प्रतिमा समाजात आणखी वाढली पाहिजे – दिनकर शिंदे

143

🔸विविध सामाजिक उपक्रमाने डिजीटल मिडीयाच्या वतिने दर्पण दिन साजरा

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.6जानेवारी):-समाजात काम करत असतांना विविध अडचणीचा सामना करावा लागतो यातून अनेक पत्रकारांचा खडतर प्रवास झालेला आहे पत्रकार यांची समाजात प्रतिमा चांगली आहे ती आणखी कशी वाढेल व ती वाढली पाहिजे आणि व्यवैस्थे विरोधात बोलण्याची हिमंत पत्रकार यांनी ठेवावी व लोकशाही जिवंत ठेवावी असे प्रतिपादन डिजीटल मिडीयाचे बीड कार्यअध्यक्ष दिनकर शिंदे यांनी केले आहे.

दर्पण दिनानिमित्त कै भगवानराव ढोबळे मुकबधिर व मतिमंद निवासी विद्यालय याठिकाणी आयोजित केलेल्या पत्रकार मार्गदर्शन शिबीरात ते बोलत होते यावेळी व्यासपिठावर उपअधिक्षक नीरज राजगूरू यांचे प्रतिनीधी पोलीस उप निरीक्षक शिवाजी भूतेकर , डिजीटल मिडीयाचे तालुका अध्यक्ष अविनाश इंगावले ,कार्यध्यक्ष शेख जावेद ,सचिव सोमनाथ मोटे,उपाध्यक्ष सुभाष शिंदे ,सरपंच भागवत जाधव,शिवाजीराव ढोबळे,मुख्याद्यापक माणिकराव रणबाबळे,यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना ते म्हणाले की,ग्रामिन भागातील पत्रकारांनी आपल्या आवती भोवती असनाऱ्या समस्या आपल्या लिखानाच्या माध्यमातून मांडल्या पाहिजेत आज चे युग हे डिजीटल आहे यामध्ये तुम्हाला बोलून क्रांती करावी लागेल पत्रकाराने बोलल्याशिवाय आता पर्याय नाही म्हणून सर्व पत्रकाराची समाजात चांगली प्रतिमा आहे ती प्रतिमा आणखी चांगली करा वेवस्थेविरूद्ध आवाज उठवा बातमीदारी करतांना कायद्याच्या चौकटीत राहून बातमीदारी करा व येनाऱ्या काळात पत्रकारांनी समाज उपयोगी कार्य करा आणि येनारा काळ हा डिजीटल युगाचा आहे हे मात्र कूनीही विसरून चालनार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

डिजीटल मिडीयाच्या वतिने याठिकाणी मतिमंद व मुकबधिर विद्यार्थी यांना मनोरजंनासाठी 43 इंची टिव्ही भेट दिला तसेच शालेय साहित्य खाऊ वाटप करण्यात आले यावेळी.श्याम जाधव,देवराज कोळे,अफरोज शेख ,अमोल भांगे,शेख खाजा ,चंद्रकात नवपुते,शेख आमिन,गणेश ढाकणे,राजेंद्र नाटकर ,सह आदीजन उपस्थित होते.