चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचा पत्रकार दिन साजरा

106

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.6जानेवारी):-बदलत्या कालानुरुप पत्रकारितेचे स्वरुप ही बदलत आहे. आज प्रिंटमिडीया सोबतच इलेक्ट्रोनिक मीडीया,सोशल मिडीया ही सक्रिय आहेत. संपूर्ण विश्व , देश आणि समाजात होत असलेले परिवर्तन बघता आपण सर्व पत्रकार समाजाला दिशा दर्शन देणारी पत्रकारीता करण्याचा संकल्प घेऊ या असे आवाहन मराठी पत्रकार परिषद मुंबई चे केंद्रिय प्रतिनिधी मुरलीमनोहर व्यास यांनी चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार दिन समारंभ प्रसंगी केले.

मराठी पत्रकार दिन समारंभ शनिवार दि. 6 जानेवारी रोजी मराठी पत्रकार भवनात पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडूभाऊ लड़के यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्याचा आला. या प्रसंगी मराठी पत्रकार परिषद मुंबई चे केंद्रिय प्रतिनिधी बबनराव बांगडे प्रमुख अतिथी होते.
अध्यक्ष बंडूभाऊ लड़के आणि अतिथींच्या हस्ते माता सरस्वती, बाळशास्त्री जांभेकर आणि लोकमान्य टिळकांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले.

अध्यक्ष बंडूभाऊ लड़के यांनी मराठी पत्रकार भवनाच्या नविन बांधकामाची माहिती दिली. आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी पत्रकार भवनाच्या बांधकामासाठी एक कोटी रूपयांचा निधी मंजूर करवून दिला. नविन बांधकामाचे भूमि पूजन लवकरच करण्यात येईल.

या प्रसंगी श्री बबनराव बांगडे, मोरेश्वरराव राखुंडे , सुनिल तिवारी, सुरेश डांगे आदिंनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन सरचिटणीस सुनिल तिवारी यांनी केले. या प्रसंगी मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रगुप्त रायपूरे, सचिव नामदेव वासेकर , विजय लड़के, अंबिका प्रसाद दवे,सिद्धांत लडके, नरेश नीकुरे, हेमंत रूद्रपवार, तेजराज भगत, हर्षल आदि मान्यवर उपस्थित होते.