महात्मा फुले हायस्कूल येथे सी एम भोळे यांना दिला निरोप !…

197

🔸श्री. भोळे सर म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व – मुख्याध्यापक जे एस पवार

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील)

धरणगांव(दि.13जानेवारी):-शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे आज रोजी शाळेतील उपशिक्षक सी एम भोळे यांना निरोप देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रिडा विभाग प्रमुख एच डी माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. चंद्रकांत मधुकर भोळे यांनी महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेत ६ वर्ष सेवा केली. आता त्यांची बदली झाली असून ते आपल्या मूळ शाळेवर जय गुरुदेव माध्यमिक शाळा खर्दे येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.किरण कुवर यांच्या आदेशाने रुजू झालेले आहेत.

शाळेच्या वतीने मुख्याध्यापक यांच्या हस्ते त्यांना शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला. याप्रसंगी शाळेतील उपशिक्षक एस व्ही आढावे, पी डी पाटील, व्ही टी माळी, यांनी सी एम भोळे सर यांच्या सहा वर्षातील मैत्रीच्या विविध पैलूंवर आठवणींना उजाळा दिला. सत्कारमूर्ती सी एम भोळे यांनी शाळेचे आभार व्यक्त केले या सहा वर्षांमध्ये शाळेच्या शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद यांनी मला खूप प्रेम दिले व सर्वांच्या सहकार्याने ही सहा वर्ष कुठे निघाले मला कळलेच नाही एक परिवाराच्या सदस्या सारखं मला सांभाळून घेतले असे प्रतिपादन भोळे यांनी केले.

सी एम भोळे सर म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्यांना आम्ही सर्व प्रेमाने गुगल बाबा म्हणायचो असे मत शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी मांडले व भोळे सर यांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी संपूर्ण स्टॉप च्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एन कोळी तर आभार एच डी माळी यांनी मानले.