जबरी चोरी करण्याच्या आरोपीला उमरखेड पोलीसांनी 24 तासात अटक

404

✒️सिध्दार्थ दिवेकर(यवतमाळजिल्हा प्रतिनिधी)मो:-9823995466

उमरखेड(दि.15 जानेवारी):- येथे जबरी चोरी करण्याच्या आरोपी ला उमरखेड पोलीसांनी 24 तासात केली अटक केली आहे. घटना तारीख वेळी व ठिकाणी दि. 13 जानेवारी 2024 रोजी तक्रारदार बाळु दत्ता राठोड वय 34 वर्ष रा. नागापुर रुपाळा ता. उमरखेड जि. यवतमाळ हे सांयकाळी 5:30 वा आई वडिलाचा डब्बा अंबोवन तलाव येथे घेवुन जानेकरीता गावात रुपाळा येथे आला व डब्बा घेवुन निघाला असता त्याच्या मोटार सायकल मध्ये पेट्रोल कमी असल्याने उमरखेड येथील सारडा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरुन अंबोवन तलाव कडे ढाणकी रोडने जात असतांना उडाण पुल ढाणकी रोड जवळ एक मोटर सायकलवर आलेल्या दोन अनोळखी ईसमांनी तक्रारदार च्या मोटार सायकल ला कट मारून गाडी थांबव म्हणाले परंतु आरोपी ने गाडी थांबवली नाही व पुढे गेला.

तक्रारदार याने चुरमुरा फाट्यावर थांबुन त्याच्या वडिलांसाठी पान ठेल्यावर बिडी बंडल घेतले व तो अंबोवन तलावाकडे जाण्या करीता मोटार सायकलने निघाला असता चुरमुरा फाट्या पासुन 100 मीटर पुढे आला असता स्प्लेंडर कपंनी ची मोटार सायकल क्र. MH 29 CA 4495 वर बसुन आलेले दोन अनोळखी व्यक्ती वय अंदाजे 26 ते 27 वर्षाचे आले व म्हणाले की, थांब तु गाडी बाजुला घे असे म्हटले असता तक्रारदार ने गाडी बाजुला घेतली असता.

काळ्या रंगाचे शर्ट घातलेल्या आरोपींनी तक्रारदार सोबत वाद घातला व जबरीने शर्टच्या वरच्या खिश्यात असलेले 9700 रु. नगदी जबरीने हिस्कावुन घेतले. व आरोपी मोटारसायकल चालक याने पॅन्टच्या उजव्या खिश्यात असलेला तक्रारदार चा जुना वापरता रेड-मी कंपनीचा मोबाईल किंमत 2000 रु असे दोन्ही हिस्कावुन घेतले आणि मोटार सायकलवर बसुन निघुन जात असतांना तक्रादार ने त्यांची स्प्लेंडर कपंनी ची मोटार सायकल क्र. MH 29 CA 4495 ही पाठी मागुन असलेल्या स्टीलच्या कॅरीयर ला पकडुन खाली पाडण्याचा व त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला.

परंतु चालकाने तक्रारदार च्या गालावर चापट मारुन ते माझे पैसे व मोबाईल घेवुन पळून गेले.
अशा तक्रारदार च्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन उमरखेड येथे अपराध क्र.31/2024 कलम 392, 34 भा. द. वि. चा गुन्हा नोंद असुन तपासावर आहे.

गुन्ह्यात तक्रारदार ने सांगीतलेल्या वर्णनावरून व आरोपीने गुन्ह्यात आरोपीने वापरलेली मोटारसायकल चा शोध घेत असतांना मुखबीर द्वारे मिळालेल्या खबरीवरून गुन्ह्यातील आरोपी 1) स्वराज उर्फ राहुल सदाशीव बोक्से वय 21 वर्ष रा. यशोदा नगर महागाव रोड उमरखेड ह्याला दि.15 जानेवारी रोजी अटक करून आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल क्र. MH-२९ CA ४४९५ आणि एक व्हिओ कंपनीचा मोबाईल किं. १००० जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यातील आरोपी क्र.2 चा शोध सुरू आहे.

सदर ची कार्यवाही ही डॉ. श्री. पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, प्रदिप पाडवी उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड, शंकर पांचाळ, पोलीस निरिक्षक/ ठाणेदार पोलीस स्टेशन उमरखेड ह्यांच्या मार्गदर्शनात निलेश शं. सरदार, सहा. पोलीस निरिक्षक, पोहवा मोहन चाटे, पो. शि. गिरजप्पा मुसळे, पो. शि. गजानन गिते, चालक पो. शि. दादाराव मिरासे यांनी केली आहे.