पी. आर. पाटील शिक्षण महाविद्यालयात (बी.एड्.) अमरावती येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी

45

✒️अमरावती प्रतिनिधी(सस्प्निल गोरे)

अमरावती(दि.17अमरावती):-पी. आर. पाटील शिक्षण महाविद्यालय, (बी.एड.) अमरावती येथे दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. अनुप्रिता देशमुख उपस्थित होत्या.

या कार्यक्रम प्रसंगी सर्वप्रथम विद्येची देवता माता सरस्वती, जिजाऊ माता, स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमेचे पुजन पी. आर. पाटील शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुप्रिता देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.या सोबतच उपस्थित डॉ. विजया कंकाळे, डॉ. प्रा. वैशाली धर्माळे तसेच प्रा. सविता ठाकरे, यांनी सुद्धा प्रतिमेचे पूजन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋतुजा पतींगे बी.एड्. प्रशिक्षणार्थी यांनी केले.

या प्रसंगी गौरव बढे, अंजली डोंगरदिवे, मिनल लाचूरे, सृष्टी पाटील व वासुदेव घोपे या विद्यार्थ्यांनी आपले स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. तसेच अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ.अनुप्रिता देशमुख यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या विचारावर प्रकाश टाकला. युवकांनी आपल्या जीवनामध्ये स्वामी विवेकानंदाचा आर्दश घेऊन राष्ट्रकार्य करावे तसेच महिलांनी जिजामातेच्या जिवनातील प्रसंगातून आर्दश स्त्री कशी असावी यासंदर्भात विषय मांडणी केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचानल प्रगती कनेर बी.एड प्रशिक्षणार्थी यांनी केले तर आभार प्रदर्शन दिक्षा काकडे यांनी केले.या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद उपस्थित होते. सर्व बी.एड्. प्रशिक्षणार्थी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते.