वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये विद्यार्थी व्यापार मेळावा संपन्न

77

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.17जानेवारी):- श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे विद्यार्थी – व्यापार मेळावा ( Trade Fair 2024) चे आयोजन मकर संक्रांतीला सोमवार, दि. 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8 ते 1 या वेळेत करण्यात आले.  “एक पाउल उद्योजकतेकडे’ हे ब्रीद घेऊन विद्यार्थ्यामध्ये व्यापार कौशल्य विकसित व्हावे व त्यांनी व्यवहार ज्ञान समजून घ्यावे हे ध्येय ठेवून सदर व्यापार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या व्यापार मेळाव्याचे उदघाटन यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडचे प्राचार्य डॉ. सूर्यकांत केंगार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा. श्री अल्ताफहुसेन नसरुद्दीन मुल्ला साहेब व संस्थेचे विश्वस्त व सदस्य मा. अरुण पाटील (काका) उपस्थित होते. त्यांनी सर्व स्टॉलला भेटी देऊन विद्यार्थांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले.

या व्यापार मेळाव्यामध्ये जवळजवळ 60 स्टॉल लावले गेले.  त्यामध्ये खाद्यपदार्थ, शेती उत्पादने, सेंद्रिय उत्पादने, हस्तकलेच्या वस्तू, सौदर्य प्रसाधने व आभूषणे, शोभेच्या वस्तू, सजावटीच्या वस्तू, कपडे, शैक्षणिक साहित्य, मेहंदी विक्री व काढणे, स्केच तयार करणे, फनी गेम्स इत्यादी प्रकारचे स्टॉल विद्यार्थांनी उभारले होते. या व्यापार मेळाव्याला कराड परिसरातील विद्यार्थी, पालक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून वस्तू खाद्य पदार्थ यांची खरेदी केल्यामुळे विद्यार्थांचा उत्साह वाढला.

वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर विद्यार्थी व्यापार मेळावा उत्साहात पार पडला. सदर विद्यार्थी व्यापार मेळाव्यास दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.