कोलारीच्या कृतीकाची ईस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड

287

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि 31जानेवारी):-तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या कोलारी येथिल जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी कृतीका मदन गोपाल हुमने हीची ईस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याने परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

सन 2022-2023 मध्ये कृतीकाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये विशेष प्राविण्य मिळवले होते.त्यामुळे जिल्हा परिषद चंद्रपूर ने कृतीकाच्या पराक्रमाची दखल घेवून बालवैज्ञानिक म्हणून निवड केली आहे. कृतीका सोबतचं कोसंबी येथिल जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी सुजल परमानंद शेंदरे व कोलारी शाळेचे मुख्याध्यापक तथा तोरगांव केंद्र प्रमुख एम.ई.खोब्रागडे यांची निवड केली असून यांना संशोधनीय अभ्यास दौऱ्यासाठी ईस्रो अंतराळ संशोधन केंद्र बेंगळुरू येथे पाठवण्यात आले आहे.

30 जानेवारी ते 5 फेब्रुवारी या कालावधीत कृतीका ईस्रो अभ्यास दौरा करणार आहे.कृतिकाने आपल्या यशाचे श्रेय आई मनोरमा ,व वडील मदन गोपाल हुमने तसेच शाळेचे मुख्याध्यापक एम.ई. खोब्रागडे सर , मार्गदर्शक शिक्षक एस.ठाकूर सर,सर्व शिक्षक वृंद,शाव्यस.अध्यक्ष जगदीश तलमले उपाध्यक्ष रुपाली हुमने,सरपंच कांचन तुपटे,उप सरपंच श्री.नुतन प्रधान , तसेच गटशिक्षणाधिकारी माणिक खुणे,शिक्षण विस्तार अधिकारी डॉ.विद्या शेळके,यांना दिले असून सर्वत्र कृतीकाची अभिनंदन केले जात आहे.