शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन

122

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.31जानेवारी):-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले आमदार अनिल बाबर यांचे आज निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. खानापूर-आटपाडी विधानसभेचे ते आमदार होते.

काल (मंगळवारी) त्यांना न्यूमोनिया झाल्याने दुपारी सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सरपंच ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही ते निकटवर्तीय होते. अनिल बाबर यांच्या निधनाने आज होणारी मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे. टेंभू योजनेचे जनक म्हणून त्यांची ओळख होती. ते सलग 20 वर्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

“मंत्रिपदाची नव्हे तर टेंभू योजना पूर्ण करण्यासाठी आणि मतदार संघातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी आपण एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहोत,” अशी प्रतिक्रिया त्यांनी शिंदे गटात जाताना दिली होती.