तुकाराम चौरे धम्मभूषण पुरस्काराने सन्मानित

93

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.5फेब्रुवारी):-महाबोधी बहुउद्देशीय संस्था अमरावती वडफळी वटफळा तालुका नेर जिल्हा यवतमाळ अध्यक्ष प्रा.भंदत सुमेध बोधी महाथेरो यांच्या उपस्थितीमध्ये २ व ३ फेब्रुवारीला १२वी बौद्ध धम्म परिषदेचे राजश्री शाहू मैदान येथे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुसद तालुक्यातील तुकाराम चौरे यांना त्यांच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना धम्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तुकाराम चौरे हे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसदचे सरचिटणीस आहेत. त्यांनी कार्यकारणीच्या साहाय्याने ५८दहा दिवशीय उपासक उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीरे, बाल श्रामनेर शिबीर, २०१७पासून बुद्ध पौर्णिमेच्या औचित्य साधून बौध्दाचार्य श्रामनेर शिबिराचे आयोजन, धम्माचा प्रसार व प्रचार करण्याचे सतत कार्य चालू आहे.

पांडुरंग मोरे विद्यालय उमरी (कापेश्वर) परिसरात धम्म परिषदेचे आयोजन करून अनेक मान्यवरांना बोलावुन समाज जागृतीचे कार्य करून तसेच आणि सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र करून बुद्ध जयंती ,छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य म,ज्योतिबा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धम्मप्रवर्तन दिन, क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंतीचे आयोजन करून माणसे जोडण्याचे कार्य केले.

शिक्षक असताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून चांगले विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले. त्यांचे विद्यार्थी आज चांगल्या पदावर कार्यरत आहेत. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची गणना होते. त्यांच्या हातून अनेक मंगल परिणय सुद्धा संपन्न करण्यात त्यांचा फार मोठा सहभाग आहे. हे त्यांचे कार्य सतत चालू आहे. सर्वांच्या सुखदुःखात ते नेहमी सहभागी होतात .त्यांना धम्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.