म. रा. प्रा. शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी गठीत

105

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपुर(दि.8जानेवारी):-म.रा.प्रा.शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी सहविचार सभा नागपूर विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे यांच्या अध्यक्षतेखाली वसंत भवन, चंद्रपूर येथे संपन्न झाली.शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी सहविचार सभेला प्रमुख अतिथी म्हणून विभागीय प्रसिद्धी प्रमुख राजाराम घोडके,जिल्हाध्यक्ष नंदकिशोर शेरकी,जिल्हा कार्याध्यक्ष जब्बार शेख उपस्थित होते.या सहविचार सभेत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.प्राथमिक शिक्षक भारतीची जिल्हा कार्यकारिणी या सहविचार सभेत गठीत करण्यात आली.

जिल्हा कार्यकारिणीत जिल्हाध्यक्षपदी नंदकिशोर शेरकी(मूल),कार्याध्यक्ष जब्बार शेख(राजुरा),सरचिटणीस राजेश घोडमारे(भद्रावती),संघटक विरेनकुमार खोब्रागडे(राजुरा),कोषाध्यक्ष विलास फलके(कोरपना),प्रसिद्धीप्रमुख सुनिल दुर्गे(कोरपना),प्रसिद्धीप्रमुख विजय मिटपल्लीवार(सावली),उपाध्यक्षपदी गिरीधर कोडापे(पोंभुर्णा),पंढरी पवार(जिवती), छबन कन्नाके(मूल),वसंत जनगणवार (ब्रम्हपुरी),राजेश ठमके (वरोरा), सहसचिवपदी शिवाजी पवार(जिवती),सहसंघटकपदी बंडू कन्नाके(गोंडपिपरी),जिल्हा महिला अध्यक्षपदी निर्मला सोनवने(नागभीड) तर महिला कार्याध्यक्ष रंजना तडस (भद्रावती),सरचिटणीस माधुरी पोंगळे (वरोरा) यांची निवड करण्यात आली.सर्व नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे राष्ट्र सेवा दल व शिक्षक भारतीची दिनदर्शिका देऊन स्वागत करण्यात आले.

सहविचार सभेला म. रा.प्रा.शिक्षक भारती चिमूरचे तालुका सचिव कैलास बोरकर,राजुरा तालुका अध्यक्ष संजय बोबाटे, गिरीधर बोबडे,पोंभुर्णा तालुका अध्यक्ष प्रभाकर कुळमेथे,गोंडपिपरीचे कचरू कोंडेकर,जिवती उद्धव पवार, मुलचे तालुका अध्यक्ष क्रिष्णा बावणे, भद्रावतीचे तालुका अध्यक्ष गणेश टोंगे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.सहविचार सभेचे संचालन नंदकिशोर शेरकी यांनी केले.आभार कैलाश बोरकर यांनी मानले.