काँग्रेस नेते मोईज शेख यांचा काँग्रेसला अखेरचा सलाम

318

🔸35 वर्षे पक्षात सक्रिय राहून सुद्धा सतत अपमानास्पद वागणूक

✒️पालघर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पालघर(दि.8फेब्रुवारी):-सत्य बोलण्याच्या आणि लीहण्याच्या सवयी मुळे पक्षातील काही मंडळींचा शेख यांना सतत बायपास दिलेले वरिष्ठ उपाध्यक्ष पद हे केवळ नावाचे. सर्व कारभार नवख्या आणि अडाणी लोकांच्या हाती. प्रत्येक वेळी, पक्षासाठी आणि जिल्हा संघटने साठी महत्त्वपूर्ण योजना सांगितल्या. पण सल्ल्याची कदर नाही.मागील पाच प्रदेशाध्यक्षांकडे सतत जिल्ह्याचा खरा अहवाल पाठवला.पण कोणतीच कारवाई नाही.
जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांचे हे एकमेव धोरण राहिले, की
मोईज शेख ने आयोजित केलेल्या सभा, आंदोलनाला जायचे नाही. बहिष्कार टाकायचा. शो फ्लॉप करायचा एवढेच पक्षातील काही मंडळींचे काम. खोटे अहवाल, खोटे समाचार प्रदेश ला पाठवून प्रदेशची नेहमी जिल्ह्यातील नेत्यांनी दिशाभूल केली. काही तथाकथित आदिवासी नेते,कुणबी नेते काँग्रेस पक्षात येवून अचानक आक्रमक झाले, त्यांचा स्वप्नात असा गैर समज झाला की काँग्रेस आमच्याच पिताश्रींची. त्यांच्या कच्च्या अनुभवामुळे जिल्ह्यात काँग्रेस रसातळाला गेली.

काही लोक निवृत्ती नंतर टाईमपास म्हणून काँग्रेस पक्षात आले. त्यांची फुकटची ढवळाढवळ वाढली. नोकरीत पगार सरकारचा घेतला, पेन्शन सरकारची चालू, मेल्यानंतर बायकोला अर्धी पेन्शन असे सर्व काही फिक्स असताना केवळ घरात वेळ जात नाही म्हणून काड्या करायला पक्षात येणाऱ्यांची संख्या वाढली. बाकीच्यांना त्रास वाढला.

प्रदेश काँग्रेस कमिटीने पालघर वर पूर्ण दुर्लक्ष केले. सरळ सरळ रेल्वेच्या फर्स्ट क्लास ने पालघर ला महिन्यातून दोन मोठ्या नेत्यांना कामाला जुंपले असते तर संगठना वाढली असती, पण रोड शो करत यायचे, रस्त्यात शाली, गुच्छ स्वीकारायचे, एक दिवसाचा पोरखेळ करायचा आणि निघून जायचे असेच काम सर्व नेत्यांनी केले. जिल्ह्यात कुमार केतकर,भालचंद्र मुणगेकर,हुसैन दलवाई, निखिल वागळे यांच्या सारख्या एकही प्रभावी वक्त्यांची भाषणे जिल्ह्यातील नेत्यांना आयोजित करता आली नाही. हे सगळे बिचारे फुकटात येणारे.

फक्त यांना सन्मान हवा होता. आणि हे सर्व डाळ भात जेवतात हे विशेष.एवढे मोठमोठे जिल्ह्यात काँग्रेस चे हॉल असताना, या नवख्या नेत्यांना हे जमले नाही. काँग्रेस च्या हॉल मध्ये दुसऱ्याच पक्षाचे मोठ मोठे कार्यक्रम होतात. नुकताच अंबादास दानवे याचा झालेला कार्यक्रम हे ताजे उदाहरण.

आता हसावे की रडावे, हेच समजत नाही. पक्षासाठी घाम गाळला, रक्त दिले आता मी जीव तर देवूच शकत नाही म्हणून मी पक्ष सोडला.पक्षातील काही गद्दार नेते, गांधी परिवारातील आणखी एकाचा जीव कसा जाईल, सहानुभुतीच्या लाटेवर आपसूक स्वार होवून आमदार खासदार कसे बनू याचीच दिवसरात्र स्वप्ने काही धूर्त काँग्रेसमधील चालू लोक बघत आहेत. काँग्रेस जरी मी सोडली, तरी आताच्या गांधी परिवारातील सर्व सदस्य ज्या ज्या वेळी त्यांचे मरण येईल त्यावेळी पूर्ण जीवन आनंदात जगून नैसर्गिक मौत मरावेत अशी मी माझ्या अल्लाह कडे गुडघे टेकून प्रार्थना करतो.

(मरण हे सर्वासाठी अटळ आहे. सर्वाँना नैसर्गिक मरण यावे हीच माझी प्रार्थना.)पालघर जिल्ह्यातील काँग्रेस विनाशाला प्रदेश काँग्रेस आणि त्यातील काही खीसेभरू पदाधिकारी जवाबदार आहेत.बळीराम जाधवांना सीट सोडली, त्याच वेळी काँग्रेस संपली.राहिलेली उरली सुरली आता 2024 ला संपेल हेही आताच पालघर काँग्रेस वाल्यांनी लक्षात घ्या. पालघर सीट साठी आंदोलने करा, धरणे द्या, उपोषणे करा. पण आता पक्षात राहिलेल्या काँग्रेस वाल्यानो, तुम्हाला हे जमणार नाही. हुतात्मा स्मारका जवळ आंदोलन, धरणे याला 20/25 काँग्रेस कार्यकर्ते जमतात हा आपला इतिहास आणि एखाद्या आपल्या पक्षाच्या कार्यक्रमाच्या वेळी स्टेजवर बसायला भाऊगर्दी. त्यावेळी स्टेज कमी पडतो, खुर्च्या कमी पडतात. ही आपली अवस्था त्यावेळी अचानक कुठून येतात हो ही झकपक मंडळी आणि कार्यकर्ते. कडक कुर्ता आणि कडक साड्या घालून.

हा मला पडलेला एक विनोदी प्रश्न आहे. मला अधिकार मिळाले नाहीत. मी परिस्थिती बदलू शकलो नाही, याची खंत नेहमीच मनात राहील. माझ्या बोलण्याने प्रदेश वाले दुखावले असतील पण त्याला माझा नाइलाज होता. सत्य जगापुढे आणणे माझे कर्तव्य होते. कंडक्टर लागला बस चालवायला की बस खड्ड्यात जाते. असाच काहीसा प्रकार आताच्या घडीला पालघर काँग्रेस मध्ये झाला. सध्या तरी जसी तशी बस हा कंडक्टरच चालवत आहे. कधी नव्हे, ती जात पात मला काँग्रेस मध्ये गेल्या 2/3 वर्षात कळली. जातीचे राजकारण हे किती वाईट असते हे रोज आपण टीवी वर पाहतच आहोत. आता तर पोटजातीचे राजकारण सुरू आहे.

काँग्रेस मध्ये जातीचे राजकारण कधीच नव्हते. असे असते तर बाबू जगजीवनराम आपले राष्ट्रीय अध्यक्ष झाले असते का?सगळ्या क्षेत्रात अनुभवी लोकांची कदर असते, सन्मान असतो.35 वर्षात 200/500 भाड्याची माणसे जमवून मलाही प्रदेश चे महत्त्वाचे पद घेता आले असते.पण मी एका स्वातंत्र्य सैनिकाचा सुपुत्र आहे. ढोंगीपणा माझ्या रक्तात नाही आणि कधीच नव्हता आणि पुढेही नसेल याची मी ग्वाही देतो. महिना 2 लाखाची आरामाची नोकरी आणि मर्सिडीज बेंझ E300 सोडून मायदेशी काँग्रेस पक्षात येवून इमानदारीने सेवा करणारा माझ्या सारखा क्वचितच मिळेल. माझ्या 35 वर्षाच्या कारकिर्दीत ज्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्या स्व.शिंगडा साहेब, स्व.नमसाहेब, स्व. बाबुराव वाघात साहेब,स्व.जयंतराव पाटील साहेब,स्व.दादी सेठ इराणी साहेब,स्व. जी. डी.तिवारी साहेब यांच्या पवित्र स्मृतींना वंदन आणि नमन करतो. आणि माझ्या सोबत 35 वर्षे काँग्रेस प्रवास केलेल्या काँग्रेस प्रेमीची रजा घेतो.