आदर्श शाळेत आदर्श विद्यार्थी घडावे.. डॉ. सतीश वारजुरकर चिमूर तालुक्यातील हिरापूर येथील शाळेला आदर्श शाळेचा दर्जा.

205

 

कार्यकारी संपादक//
उपक्षम रामटेके📱9890940507

भारत देशाचे तात्कालीन पंतप्रधान माननीय मनमोहन सिंग यांनी 2007 साली स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणात आदर्श शाळा योजनेचा उल्लेख केला, त्यानंतर प्रतिगट एक शाळा या प्रमाणात बुद्धिमान व ग्रामीण भागातील बालकांना दर्जेदार शिक्षण देता यावे, यासाठी उत्कृष्ट तेचा मापदंड असणाऱ्या आदर्श शाळा उभारणे हा या योजनेचा उद्देश आहे.
त्यानुसार महाराष्ट्र सरकारने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा शारीरिक व भावनिक क्षमतेच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ग्रामीण भागातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा ना काही निकषाच्या आधारे आदर्श शाळा अंतर्गत काही निधी प्रदान केली जाते, चंद्रपूर जिल्हा परिषद चे मा.अध्यक्ष सतीश भाऊ वारजूकर यांच्या प्रयत्नातून चिमूर तालुक्यातील हिरापूर येथील शाळेला आदर्श शाळेच्या दर्जा मिळाला, या योजनेअंतर्गत हिरापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला एक कोटी आठ लाख दहा हजार रुपये मिळणार आहेत. मिळालेल्या निधीतून हिरापूर येथील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शारीरिक, सर्वांगीक, क्षमतेच्या विकासाला प्राधान्य मिळणार आहे.
चिमूर तालुक्यातील हिरापूर येथील आदर्श शाळेच्या दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे माननीय सतीश भाऊ वारजूरकर व चिमूर पंचायत समितीचे माजी उपसभापती रोशन ढोक यांचा सत्कार हिरापूर वासियायांनी केला, त्यावेळी ग्रामपंचायत सरपंच मंदा उरकुडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैभव दडमल, ग्रामपंचायत सदस्य दीपक नगराळे, गुणवंता ढोक, बंडू पोहनकर, उपस्थित होते.