भारतीय बौध्द महासभेच्या स्मरणिकेसाठी संपादक या पदावर प्रा.सिद्धार्थ गायकवाड यांची नियुक्ती

60

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

यवतमाळ(दि.10फेब्रुवारी):-दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा तर्फे यवतमाळ येथे बोधिसत्व बुद्धविहाराचे बांधकाम प्रगती पथावर असुन हे बांधकाम शक्य तेव्हढे लवकर पुर्ण करून सुर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.12/12/2025 ला बोधिसत्व बुद्धविहाराचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

संस्थेच्या यवतमाळ जिल्हा शाखेच्या कार्यकारीणीला 2025 मध्ये 25 वर्षाचा कालखंड पुर्ण होणार आहे. जिल्हा शाखा यवतमाळ तर्फे गेल्या 25 वर्षातील कामकजाचा लेखाजोखा या स्मरणिकेत राहणार आहे. त्याशिवाय धम्मदीक्षा धम्मपरिषदेचे आयोजन/ इंटरनॅशनल टुर/ राष्ट्रीय पर्यटन / महाराष्ट्र गोवा पर्यटन/ समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर / महीला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन/ बाल श्रामणेर शिबिर / युवती-युवक प्रशिक्षण शिबिर / बौद्धांचार्य श्रामणेर शिबिर / केंद्रीय शिक्षक व केंद्रीय शिक्षिकांची निर्मिती/बौद्धांचार्याची निर्मिती/विविध तालुका शाखेच्या वतीने उल्लेखणीय कार्याची माहिती या स्मरणिकेत राहणार आहे. त्याशिवाय धम्म संघर्ष यात्रा / धम्म संदेश यात्रा / बोधिसत्व बुद्धविहाराच्या बांधकामासाठी ज्यांनी 5000/₹ व त्यापेक्षा जास्त निधी देऊन सहकार्य केले आहे अशा देणगी दात्यांचे नावे /रूपये 500 / प्रत्येकी 100 देणगी दाते करणारे कार्यकर्त्यांचे फोटोसह नावाचा उल्लेख राहील

तसेच या स्मरणिकेत विविध लेखकांचे उल्लेखणीय लेख / कविता संग्रह / शुभेच्छा /अभिप्राय ईत्यादी बाबीचा समावेश राहील या स्मरणिकेची जबाबदारी प्रा.सिद्धार्थ गायकवाड संपादक यांचे कडे देण्यात आली असुन या संपादकीय मंडळात एकुण 5 ते 7 सदस्यांचे कार्यकारी मंडळ राहील लवकरच या बाबत संस्थेच्या पुढील बैठकीत चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल करीता कळविले आहे.