देलनवाडी ग्रामपंचायतीचा सरपंच पदी मंदा मेश्राम यांची निवड

140

✒️प्रशांत गेडाम(विशेष प्रतिनिधी)

सिंदेवाही(दि.15फेब्रुवारी):- सिंदेवाही तालुक्यातील ग्रामपंचायत देलनवाडी येथे दि.14/ 2 /2024 रोजी दुपारी 2 वाजता घेण्यात आलेल्या सरपंच पदाचे निवडणुकी बाबत देलनवाडी ग्रामपंचायत सरपंचावर अविश्वास आल्या कारणाने आज सरपंच पदाकरता निवडणूक घेण्यात आली होती.

निवडणूक कार्यक्रमांमध्ये अध्यासी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी अंबादास गेडाम तहसील कार्यालय सिंदेवाही, तलाठी विवेक खरकाटे व ग्रामसेवक हे उपस्थित होते‌‌. नऊ सदस्य संख्या असलेले देलनवाडी ग्रामपंचायत मध्ये सर्वसाधारण महिला म्हणून सरपंच पद राखीव होते.

त्यामध्ये मंदा शिवराम मेश्राम व वैशाली गुरुदास आनंदे या दोन महिलांनी सरपंच पदाकरता नामनिर्देशन पत्र सादर केले होते. मंदा मेश्राम यांना पाच मते पडली आणि वैशाली आनंदे यांना दोन मते पडली. यामध्ये मंदा शिवराम मेश्राम विजयी झाल्या तर यांच्याविरुद्ध असलेले वैशाली गुरुदास आनंदे यांना हार मानावे लागले.