मांडवा येथे श्री.संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

197

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.16फेब्रुवारी):-तालुक्यातील मांडवा येथे जगतगुरु श्री संत सेवालाल महाराज यांची २८५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

श्री संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरापासून सकाळी दहा वाजता पारंपारिक नृत्य व वेशभूषेत श्री संत सेवालाल महाराज यांच्या पालखीसह, श्री संत सेवालाल महाराज ,जगदंबा माता,लाखिसाहा बंजारा, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, धर्मगुरू रामराव महाराज यांच्या प्रतिमा ह्या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते. मिरवणूक गावातील मुख्य मार्गावरून काढुन मिरवणूकीची समाप्ती श्री संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरापाशी करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पोलीस पाटील दत्तराव पुलाते,तांड्याचे नायक तथा सोसायटीचे अध्यक्ष वसंता आडे, कारभारी तुकाराम चव्हाण, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण,विठ्ठल आडे , सखाराम चव्हाण,शंकर आडे,नामदेव आडे,मनोहर चव्हाण,गजानन राठोड,नत्थु राठोड, उकंडा राठोड,अशोक आडे,शक्ती आडे,बापूराव राठोड,प्रकाश राठोड,अंकुश राठोड श्री संत सेवालाल जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लहू चव्हाण,उपाध्यक्ष बजरंग राठोड तसेच सर्व पदाधिकारी मंडळी गावातील प्रतिष्ठित नागरिक समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.