धर्मनिरपेक्ष-प्रजासत्ताक लोकशाहीसाठी म.फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाची आवश्यकता!

50

🔸२२ व्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने…

सत्यशोधकी साहित्याची परंपरा ही अवैदिक, अब्राम्हणी समतावादी आहे. तिचा उगम संस्कृती संघर्षाच्या मूळातच आहे. आधुनिक काळात महात्माा जोतीराव फुले यांच्या कार्य-कर्तृत्वातून व साहित्यनिर्मितीतून सत्यशोधकी साहित्याची परंपरा पुन्हा एकदा पुनर्जीवित झाली. १८५० ते १९५० पर्यंत ह्या साहित्याची निर्मिती ही सर्व प्रकारच्या साहित्यनिर्मितीने झाली. आजही ही परंपरा जातिव्यवस्था, सामाजिक न्यायें, धार्मिक, सामाजिक गुलामगिरी ह्या विरुद्ध भूमिका घेणाऱ्या विविध साहित्य प्रवाहांतून अवतिर्ण होतांना दिसते.

धार्मिक गुलामगिरी झिडकारुन द्या ? :

सद्य:स्थितीत देशातील सर्वच प्रकारचे भ्रमित वातावरण व विषमतामूलक राजकीय भूमिका आणि भांडवलदार, मनुवादी शासन- प्रशासन आणि धर्माध शक्ती यांची अभद्र युती झाल्यामुळे समाज मन हे बेचैन झाले आहे. जाती-धर्मामध्ये वैमनस्य पेरले जात आहे. सामाजिक व आर्थिक विषमता वाढत आहे. बहुजन समाजावर धार्मिक गुलामगिरी लादली जात आहे. अनिष्ठ रुढी, कर्मकांड व धर्मांधतेला खतपाणी घातले जात आहे. परिणामतः राजमार्गाने येणाऱ्या पेशवाईमुळे भारतीय लोकशाहीला धोका निर्माण झाल्याचे अनेक पुरोगामी विचारवंत मत व्यक्त करीत आहेत.

सामाजिक क्रांतीचे आद्य प्रणेते महात्मा जोतीराव फुले यांनी दि. २४ सप्टेंबर १८७३ रोजी बहुजन समाजाला धर्माध शक्तीच्या शोषणातून मुक्त करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. बहुजन समाजाचे घटनादत्त न्यायोचित हक्क व त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी सत्यशोधकीय बुद्धीप्रामाण्यवादी पुरोगामी विचार साहित्ययातून प्रसारित होणे, ते प्रत्येकाने मनात रुजविणे व प्रत्यक्षपणे आचरणात आणण्याची गरज निर्माण झाली असून म. फुलेंच्या वैश्विक विचारांना देश व जातीचे परीध तोडून बाहेर नेण्याची गरज आहे.

म. फुले प्रणित सत्यशोधकीय साहित्य व विचार वैज्ञानिक हे जिवनदृष्टी देणारे आहेत. ही दृष्टी विघातक नसून विधायक आहे. विध्वंसक नसून बुद्धीप्रामाण्यवादी व सृजनशील आहे. अंधारातून प्रकाशाकडे तसेच असत्याकडून सत्याकडे नेणारे आहे.

सांस्कृतिक क्रांतीसाठी आणि बहुजन समाजाच्या मेंदुवरील प्रस्थापितांच्या जुल्मी बेड्या तोंडण्याची क्षमता सत्यशोधकीय साहित्यातच आहे. बहुजन समाजाच्या मेंदुवरील प्रस्थापितांच्या आमचे साहित्य आम्ही महात्मा समग्र लेखनातून सामान्यातील सामान्यांच्या व्यथा-वेदनांवर फुंकरच घातली तर त्यांच्यावर अन्याय- अत्याचाराला सर्वप्रथम फोडलीविषमताधिष्ठित सामाजिक व्यवस्थेविरुद्ध फुंकलेदलितआदिवासी, बहुजनांचे शोषण भट-पुरोहितांचा खरपूस समाचार घेतला.

फुलेंनी सन जून १८८५ ग्रंथकार सभेच ठणकावून सांगितले “आमचे साहित्य आम्ही निर्माण आणि आमच्या ग्रंथकार आम्ही घेऊआम्हा अतिशूद्रास काय काय विपत्ती त्रास सोसवे लागतातत्यांच्या उंटावरुन शेळ्या वळणाऱ्या सभास्थानी भाषण करणाऱ्यांस कोठून कळणार….
महात्मा फुलेंची साहित्यसंपदा : –

गेल्या शतकांपासून आधारे माणसा-माणसात निर्माण जातीत विभागणी शुद्रातिशूद्रांना मुलभूत हक्क अधिकारांपासून वंचित ठेवतोआमचे आमचेच डोक असावंपण आमचा मनुवादी प्रस्थापितांच्या अडकलाबेड्या तोडण्यासाठी . फुलेंना १८७३ मध्ये ग्रंथ लिहावा लागलातसेच भटभिक्षुकांना सवाल १८५१भटांनो उत्तर निर्मिकाचा शोध १८५३)तृतीय रत्न-नाटक १८५५पोवाडा शिवाजी राजे भोसले १८६३, शेतक-यांचा असूड १८८३, इशारा (सत्सार जून १८८५सत्सार ऑक्टोबर १८८५अस्पृश्यांची कैफियत १८८५)सार्वजनिक सत्यधर्म (१८८९अखंडादि काव्यरचना केली

भारताच्या राज्यघटनेनुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. भाषणलेखनमुद्रण स्वातंत्र्य आहेसत्यशोधक सारख्या छोट्या मोठ्या साहित्य संमेलनातून उपेक्षित दुर्लक्षित वास्तववादी चालना मिळू ह्या मराठी साहित्य परिपक्व सक्षम होण्यास चालना मिळू नवोदितांना विचारपीठ उपलब्ध फुलेंचे गुलामगिरीमधील विचारच मानवजातीला अंधश्रद्धाधिष्ठत आणि सामाजिक विषमतेकडे नेणाऱ्या जात्यंधतेमधून मुक्त करुन शकतातत्यांना वैचारिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी स्वयंपुरोहीत हाच पर्याय आहेमहात्मा फुलेंनी समाज प्रबोधनसमाज परिवर्तनासाठी आहेविविध क्षेत्रात भरारी अलिकडच्या नव्या संस्कृतीच्या सुसूत्रपणे गतीमान व्हावयास ! धर्मांधतेच्या चक्रव्युहातून समाज पडावाधर्मांधतेच्या गेलेला विवेकशून्य समाज बुद्धिप्रामाण्यवादी ह्यासाठी फुलेंच्या वाड्मयाचे वाचन त्यावर लिहिते होण्याची गरज आहे विज्ञाननिष्ठ सत्यशोधकी भेदभाव विवेकशील धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक लोकशाहीसाठी आणि समता-स्वातंत्र्य-बंधुभाव या तत्त्वांचे विचार पेरण्यासाठी महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाची आवश्यकता आहे.

✒️प्रा.श्रीकृष्ण बनसोड(किशोर नगर,अमरावती)