26 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा:युवा परिवर्तन संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या कलगुणांचा सत्कार कार्यक्रम

72

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.16फेब्रुवारी):-ब्रम्हपुरी येथे युवापरिवर्तन संस्था ही मागील अनेक वर्षांपासून आसपासच्या तालुक्यातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून टेलरिंग, ब्युटीशियन, कॉम्पुटरचे बेसिक व ऍडव्हान्स कोर्सेस, बेसिक नर्सिंग कोर्स आणि असे विविध कौशल्य विकास प्रशिक्षण अगदी माफक दरात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून, त्यांना योग्य रित्या प्रशिक्षण देऊन बेरोजगार युवक – युवतींना रोजगार देण्याचे उत्तम कार्य युवा परिवर्तन संस्था करीत आहे.

दि.15 फेब्रुवारी 2024 रोजी गुरुवारला युवा परिवर्तन संस्थेचा 26 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मोहन वाडेकर सर होते., तर मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.क्रिष्णा राऊत सर, प्रमुख अथिती म्हणून डॉ.अंजली वाडेकर मॅडम, डॉ.उदयकुमार पगाडे सर (युवा समाजसेवक), प्रा.लालाजी मैंद सर., प्रा.श्रीकांत कळसकर सर., सचिन दिघोरे सर (व्यवस्थापक – युवा परिवर्तन ब्रम्हपुरी) यांच्या उपस्थितीत पार पडला.

ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सावन सहारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ.कुंदा निकुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वर्षा भानारकार, रमाकांत बगमारे, पियुष यांनी व आदी लोकांनी उत्तमरित्या सहकार्य केले.