चला शिकूया महापुरुषांचे विचार – अत्तदीप धुळे

111

✒️सिध्दार्थ दिवेकर(यवतमाळ,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9823995466

उमरखेड(दि.17फेब्रुवारी):-S-Zone अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना संत सेवालाल महाराज जयंती निम्मित अत्तदिप धुळे यांनी मार्गदर्शन करताना पुढील शब्दात आपले विचार मांडले.

“शिकच शिकावचं शिकेर राज घडवाचं, शिक्षणेती कुळिर उध्दार हो जाव छ.”जो शीकेल तोच शिकऊ शकेल शिकलेलाच राज घडवू शकतो, शिक्षणानेच आपल्या कुळाचा उध्दार होऊ शकतो.

आजचा भारत विज्ञानिष्ठ युगात प्रवेश करत असताना सुध्दा खूप मोठ्या प्रमाणात भारतात अंधश्रध्दा, पाखंड, आणि गल्लीच्छ अस राजकारण सुरू आहे.

परंतु आजच्या नवयुवक तरुण पिढी ला, जो संत सेवालाल महाराज यांनी दिलेला संदेश आहे तो स्वीकारून अंगिकरण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक नवयुवक तरुण हा या देशासाठी भावी पिढी निर्माण करण्यात नक्कीच यशस्वी होईल आणि हा देश पृथ्वी वरील स्वर्ग बनल्या शिवाय राहणार नाही. जो पर्यंत तुम्ही शिक्षण घेणार नाही. स्वयंप्रकाशीत होणार नाही, कोणतेही गोष्ट जाणून घेऊन, त्याची छाननी करून, ते आपल्या सद्विवेक बुद्धी ला पटली तरच स्वीकारून योग्य तो दृष्टीकोन निर्माण करणार नाही तो पर्यंत तुमचा विकास होणार नाही.

“सत्य सांगे लोका जरी कडू लागे चाला, नाही मागे आला कोण,”माझ्या शरीरात जो पर्यंत प्राण आहे तो पर्यंत मी महापुरुषांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करेल. आणि माझे शिक्षण हे माझ्या बहुजन समाजाच्या उद्धारासाठी राहील अशी निर्भिड भूमिका मांडत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

तसेच S-Zone अभ्यासिकेचे संचालक मा. शरद वारकड सर यांनी यावेळी आपल्या अभ्यासिकेत प्रत्येक महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करण्यासाठी यापुढेही हा उपक्रम चालू ठेऊन विद्यार्थ्यांना मानवता वादी बनवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.