वडगाव (स्टे.) फाटा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन व बैलगाडी मोर्चा चे आयोजन

136

✒️प्रतिनिधी गंगाखेड(अनिल साळवे)

गंगाखेड(दि.17फेब्रुवारी):-सर्व मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठायोध्दा श्री. मनोज जरांगे पाटील हे मागच्या सात दिवसापासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणासाठी बसले आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून सरकार कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये जागोजागी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

दि.16/02/2024 रोजी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी वडगाव (स्टे.),निळा,वंदन हरंगुळ,उखळी(खु.) व पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर वडगाव (स्टे.)फाटा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन व बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

सदर मोर्चामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दिवसभर ठप्प होती. आंदोलन स्थळी ह.भ.प.गणेश महाराज गुट्टे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मराठा समाजाच्या वतीने खिचडी,चहा व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.

सदर आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाकडून सहकार्य लाभले.आंदोलन स्थळी गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे साहेब उपस्थित होते.ह्या रास्ता रोको आंदोलनाची सांगता मंडळ अधिकारी येल्लारे साहेब,तलाठी सिंगडवाड साहेब व पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे साहेब यांना निवेदन देऊन झाली.निवेदन देताना मराठा संघर्ष समन्वयक समितीचे अध्यक्ष श्री.श्रीकांतभाऊ भोसले व वडगाव(स्टे.),निळा,वंदन,हरंगुळ,उखळी (खु.) तसेच पंचक्रोशीतील सकल मराठा समाज बांधव उपस्थित होता.