गंगाखेड शहरातील पाणीटंचाईवर तात्काळ उपायोजना करा सुजान नागरिक मंचाची नगरपरिषदेकडे मागणी

57

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.22फेब्रुवारी):-शहरामध्ये उन्हाळा सुरू होण्याअगोदरच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे या बाबीकडे मात्र नगरपरिषद प्रशासन साफ दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.गंगाखेड शहरातील पाणीटंचाईवर तात्काळ उपायोजना करण्याच्या मागणीसाठी दि.21 फेब्रुवारी बुधवार रोजी सुजान नागरिक मंचाच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात सुजान नागरिक मंचाच्या वतीने पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत पाणीटंचाई निवारणासाठी तातडीने उपाययोजना करणे,गंगेच्या पंप हाऊस ८० एचपी मोटर ने गंगाखेड दक्षिण भागात पाणी देण्यात यावे,नगरपरिषद तर्फे मासोळी मध्यम प्रकल्पाची प्रलंबित भिंतीची उंची वाढविण्यासाठी व गाळ काढण्यासाठी संबंधित विभागाकडे मागणी करणे,प्रत्येक प्रभागात कमीत कमी चार हात पंप रस्त्यावरील चालू असलेले बोर ताब्यात घेऊन नागरिकांसाठी खुले करण्यात यावेत.

मासोळी प्रकल्प व गोदावरी नदीच्या हाऊस पंपावरील अतिरिक्त मोटारी दुरुस्तीसह तयार ठेवाव्यात मोटार जळाल्यास अडचण भासणार नाही अशा अनेक मागण्या करण्यात आले आहेत या मागण्या पूर्ण नाही झाल्यास एका आठवड्यानंतर संबंधित मागण्यांसाठी त्रिव आंदोलन करण्यात येईल यामध्ये गंगाखेड शहर बंद करणे,धरणे आंदोलन ,उपोषण आदी आंदोलने करण्यात येतील याची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहील असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर योगेश फड, रामप्रसाद ओझा,ॲड.राजू देशमुख, शिवराज मुंडे, सचिन मुंडे, रवी मुंडे, शेख महेमूद,ॲड स्मिता देशमुख,कोमल फड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत