चकलांबा पोलीसांनी केले चंदन तस्कराला जेरबंद; 38 हजाराचा मुद्देमाल जप्त

170

🔸सपोनि नारायण एकशिंगे यांची धडाकेबाज कारवाया सुरूच; चकलांबा पोलीस ठाण्याला मिळाला खमक्या अधिकारी

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.22फेब्रुवारी):-तालुक्यातील चकलांबा पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईची सध्या सर्वत्र चर्चा होत असताना. त्यांनी अवैध धंद्यांच्या विरोधात कडक मोहीम राबवली असताना चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांनी चंदन चोराच्या मुसक्या आवळून त्याकडून 38 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि, १९ फेब्रुवारी रोजी चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, कोळगाव ते मातोरी रस्त्यावरून एक चंदन तस्कर स्वतःच्या मोटरसायकल वरून एक चंदनाचे झाड तोडून त्याचा सुगंधित बंदी असलेला गाभा घेऊन जाणार आहे.

त्यानुसार चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे पोलीस कर्मचाऱ्यासह ट्रॅक्टर लावून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारतात त्याने त्याचे नाव भारत विक्रम जाधव (वय 45 वर्ष, रा. मिडसांगवी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर असे सांगितले, त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एकच गोणीमध्ये तोडलेले चंदनाचे साडेतीन किलो वजनाचे तुकडे चंदन तोडण्याचे साहित्य एक मोटरसायकल असा 38 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल मिळवून आल्याने सदस्य साहित्य जागी जप्त करून पोलीस स्टेशन चकलांबा येथे आणून गुन्हा रजिस्टर नंबर ४१/२४ आयपीसी कलम ३७९ सह कलम ४१,४२,२६ (१) (ष) भारतीय वन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार गुरव हे करत आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीरज राजगुरू साहेब, ज्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे, पोलीस हवालदार ४३ बारगजे, पोलीस शिपाई किरण मिसाळ, पोलीस हवालदार गुजर यांनी केले आहे.