पाणी पुरवठा योजनेचे मोटार पंप गेले चोरीला….? कोटगाव ग्रामपंचायत अंतर्गत दाबकाहेटी येथील प्रकार

308

कार्यकारी संपादक// उपक्षम रामटेके
📱9890940507
जल जीवन मिशन अंतर्गत कोटगाव ग्रामपंचायत येथे दाबकाहेटीसाठी अंदाजे 45 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यानुसार संबंधित ठेकेदाराने कामाला सुरुवात केली. कासव गतीने का होईना परंतु ठेकेदाराचा काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
परंतु जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा चे कामा अगोदर काही वर्षांपूर्वी मोजा दाबकाहेटी येथे जलस्वराज्य योजनेअंतर्गत पाणीपुरवठा नळ योजना ची कामे झाली होती, काही महिने दाबकाहेटी येथील नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला नंतर जलस्वराज्य ही योजना बंद पडली.
जलस्वराज्य अंतर्गत विहिरीमध्ये असणाऱ्या पाण्याच्या मोटारी व इतर साहित्य आपल्या ठिकाणी होते, परंतु जल जीवन मिशन अंतर्गत मौजा दाबकाहेटी येथे कामाला सुरुवात झाली काम करणाऱ्या ठेकेदारानि विहिरी मधून मोटारी काढल्या त्यांची किंमत अंदाजे एक लाख रुपये आहे ग्रामपंचायत च्या मासिक मीटिंगमध्ये ग्रामपंचायत सदस्यांनी पाण्याच्या मोटारीचा मुद्दा उपस्थित केला असता संबंधित ठेकेदाराने मोटारी ग्रामपंचायत मध्ये जमा करतो असे प्रत्येक मिटींगला सांगितले परंतु सहा महिन्याचा कालावधी लोटून गेला तरी ठेकेदाराने मोटारी जमा केल्या नाही आता संबंधित ठेकेदार मोटारी चोरीला गेल्या असे उत्तर देतो. त्याचबरोबर पाईपलाईनचे काम करताना योग्यरित्या झाले नाही, संबंधित ठेकेदाराने ग्रामपंचायतला लाखो रुपयांचा चुना लावला, आणि चुना लावून पान खाणारे नेमके आहेत तरी कोण याविषयी गावकऱ्यांमध्ये चर्चा चालू आहे.
त्यामुळे ग्रामपंचायत च्या काही सदस्य काही दिवसांमध्ये लेखी तक्रार दाखल करणार आहेत.