फायनांस कंपनीतील लॉकर फोडले : सहा लाखाचा मुद्देमाल लंपास

131

✒️सिद्धार्थ दिवेकर(यवतमाळ,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9823995466

उमरखेड(दि.1 मार्च):-शहरातील आनंद नगर स्थित असलेल्या भारत फायनान्स शाखेतील लॉकर फोडून सहा लाख १६ हजार ६२७ रुपय चोरट्यांनी लंपास केले.हि घटना रात्री दहा ते साडे अकराच्या दरम्यान घडली. या घटनेने उमरखेड शहरात खळबळ उडाली आहे.भारत फायनान्स च्या शाखेमध्ये व बाहेरील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आली होती.

परंतु चोरट्यांनी पुरावे नष्ट करण्याचे हेतूने सीसीटीव्हीचे संपूर्ण डी वाय एस चोरून नेऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या बाबतची तक्रार भारत फायनान्स उमरखेड या शाखेचे शाखा व्यवस्थापक कोंडवा विलास मनमंदे दिली.उमरखेड पोलीस स्टेशनला दिली. याबाबतीत उमरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेड पोलीस पुढील तपास करीत आहे.

शहरातील आनंद नगर भागात असलेल्या या शाखेत कार्यरत एकूण नऊ कर्मचारी असून ही सर्वजण रात्रीचे वेळी जेवण करण्यासाठी शाखेबाहेर शहरात गेले होते. हीच संधी चोरट्यांनी साधून तब्बल सहा लाख १६ हजार ६२७ रुपये रकमेवर अगदी रात्रीचे साडेदहा ते साडेअकरा चे दरम्यान डल्ला मारला. याबाबतीत उमरखेड पोलिसांच्या तपासाकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागल्याचे दिसत आहे.