कृतिकाची झेप : इस्रो सफर थेट

209

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.1मार्च):-नेवजाबाई हितकारिणी कन्या विद्यालय ब्रम्हपुरी ची इ. 8 वी मध्ये शिकत असलेली विद्यार्थीनी कृतिका मदनगोपाल हुमणे हिची निवड इस्रो सफर साठी झाली.

याबाबत सविस्तर वृत्त याप्रमाणे की कृतिका ही इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत जिल्हापरिषद उच्च माध्यमिक शाळा कोल्लारी येथे सातवीला शिकत असतांना, तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी 2022-23 मध्ये समाजासाठी विज्ञान या विषयावर डिजीटल इंडियात तंत्रज्ञानाशी खेळतांना या थीमवरील प्रयोगासाठी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.

या प्रयोगाचा उद्देश होता डिजिटल साक्षरता समजावून घेणे. डिजीटल साक्षरता वाढविण्यासाठी व्यापक प्रयत्न करणे. डिजीटल इंडिया अंतर्गत उपक्रमांची माहिती देणे.
त्यामुळे 2023-24मध्ये या प्रयोगाच्या अनुशंगाने तीला 31जानेवारी ते 5 फेब्रुवारी या कालावधीत इस्रो बंगळुरू या ठिकाणी सहलीस जाण्याची संधी मिळाली. या सफरीचा अनुभव सांगतांना ती अतीशय आनंदाने व्यक्त झाली.

तीथे त्यांना चंद्रयान-3 या प्रोजेक्टची 20 मिनीटांची फिल्म दाखविण्यात आली. तसेच चंद्रयान-4 व गगनीका या यंत्राविषयी वैज्ञानीकांद्वारे माहीती देण्यात आली. तसेच ISRO-U.R.RAO SATELIGHT CENTER यांनी आपल्या देशाचे प्रगतीपथ याबाबत मार्गदर्शन केले.

जवाहरलाल प्लेटोरिअम मधाये ब्रम्हांडदर्शनचा अनुभव अद्भुत असल्याचे तीने सांगीतलै. तसेच इतर प्रेक्षणीय स्थळं दाखविण्यात आले. यासाठी तीचे गाईड म्हणून कोल्हारी शाळेचे विज्ञान शिक्षक सन्माननीय खोब्रागडे सर मार्गदर्शक सोबत होते.

कृतिका जिज्ञासु, प्रज्ञावान नम्र विद्यार्थीनी आहे. तीला वक्तृत्व ,महापुरूषांचे विचार आत्मसात करणे, क्रिडेत खो-खो ही आवडते. या संधीमुळे ती इस्रो च्या क्षेत्रात अधीक अभ्यास करून वैज्ञानीक होण्याची इच्छा व्यक्त करते. या यशाबद्दल आमच्या नेवजाबाई हितकारिणी कन्या विद्यालयातर्फ तीचे सन्मान चिन्ह देवुन कौतुक, अभिनंदन,शुभेच्छासह गौरव करण्यात आले. तसेच तीचे परिवार व मार्गदर्शक सरांना धन्यवाद देवुन आनंद व्यक्त करण्यात येत आहे .