जावलीच्या सृष्टी व तृप्ती मोरे भगिनींचा डबल धमाका ; एक आरोग्य उपसंचालक तर दुसरी बरड वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती, आज जावली ग्रामस्थांच्या वतीने गौरव

170

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.1मार्च):-जावलीचे आदर्श शिक्षक दिवंगत शिवाजीराव नामदेव मोरे यांच्या सुकन्या कु सृष्टी शिवाजीराव मोरे यांची लातूर जिल्हा आरोग्य सेवा विभागात सांख्यिकी अन्वेषक (Statistical Investigator)उपसंचालक आरोग्यसेवा, लातूर पदी निवड झाली आहे तर, दुसऱ्याच दिवशी तिची धाकली बहिण असलेली कु.तृप्ती शिवाजीराव मोरे हिची बरड ता फलटण या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने मोरे भगिनींच्या या डबल धमाक्यामुळे दोघींचे सर्वत्र कौतुक होत असुन उद्या शनिवारी १० वाजता जावली ग्रामस्थांच्या वतीने या दोघींचा सत्कार करण्यात येणार आहे

सृष्टी व तृप्ती या दोघींचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जावली या ठिकाणी पूर्ण झाले पुढील शिक्षण फलटण या ठिकाणी झाले सृष्टी हिने यानंतर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मधून त्यांनी सांख्यिकीशास्त्र विषयामधून पदव्युत्तर शिक्षण घेतले घेत ४ वर्ष पंढरपूर येथे प्राध्यापक म्हणून काम केले तर तृप्ती हिने फलटण नंतर एम.बी.बी.एस चे शिक्षण श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज नरे पुणे येथे पूर्ण करुन पूणे, फलटण व म्हसवड येथे सराव केला होता

दिड वर्षापूर्वी शिवाजीराव मोरे वडिलाच्या आकस्मित निधनानंतर कोलमडून गेलेले मोरे परिवार त्यांच्या पत्नी श्रीमती वैशाली मोरे यांनी चार मुलाचे शिक्षण पूर्णत्वास नेहल्याने वडिलांचे स्वप्न दोन मुलीनी पूर्ण केल्याने जावली ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या आवारात विविध मान्यवरांच्या हस्ते या दही बहिणीचा सत्कार करण्यात येणार आहे