पत्नीची आणि दोन मुलींची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या

4125

🔺नागभिड तालुक्यातील मौशी गावातील घटना

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभिड(दि.3मार्च):- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यात मौशी येथे निर्दयी इसमाने संपविले स्वतःच्या पत्नी आणि दोन मुलींना सविस्तर, आरोपी अंबादास तलमले वय 50 वर्ष याने अल्का पत्नी 40 वर्ष, प्रणाली मोठी मुलगी 20 वर्ष आणि तेजू लहान मुलगी 17 वर्ष यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून कायमचं संपवील.

घरातील सर्व सदस्य झोपले असताना आरोपीने तिघींवर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. घरगुती वादातून ही हत्या झाल्याची चर्चा गावात उघडकीस येत आहे. आरोपीला नागभीड पोलिसांनी अटक केली घटनेचा तपास सुरू आहे. बातमी सादर करीत पर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता.