उमरखेड येथे तारांगणाचे नितीन भुतडा यांच्या हस्ते उद्घाटन

217

🔸सामान्य नागरिकांसाठी खुले)

✒️सिध्दार्थ दिवेकर(उमरखेड तालुका प्रतिनिधी)

उमरखेड(दि. 3 मार्च):- येथील देवी रोड वरील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर तारांगण व सौंदर्यकरण लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन नितीन भुतडा (भाजपा जिल्हा समन्वयक, यवतमाळ) यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुभाषराव दिवेकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई, सुरेंद्र

कोडगीरवार, अंबादास साकळे, दिलीप सुरते, सविता पाचकोरे, नितीन माहेश्वरी, ॲड. रायेवार, विजय माने इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश काळे यांनी केले.

भाजपाच्या काळामध्ये उमरखेड नगरीतील अनेक विकास कामाचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आलेले आहे. त्यामध्ये अजून एक भर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर तारांगण व सौंदर्यकरणाचे उद्घाटन लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

उद्घाटक नितीन भूतडा यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, तारांगणा बद्दल थोडक्यात माहिती सांगू इच्छितो की, पृथ्वी स्वत:भोवती फिरत सूर्याला प्रदक्षिणा घालते.

तिचा प्रदक्षिणेचा जो कालावधी असतो त्याला आपण वर्ष म्हणतो आणि स्वत: भोवती फिरते त्याला आपण दिवस म्हणतो

आपण दिवस हा तास, मिनिटे व सेंकद यात विभागतो. प्राचीनकाळी भारतात हाच कालावधी प्रहर, घटिका, पळे यात विभागला जात असे.

रोजचा हा काळ जीवन सुलभ बनवण्याचा हा एक मार्ग आहे.हे सर्व आपण मानतो.आपले काल विभाजन-वर्ष, दिवस, तास, मिनिटे, सेंकद हे निसर्ग निर्मित नाही.पृथ्वीचे स्वत:भोवती फिरणे व सूर्याभोवती फिरणे व सूर्याभोवती फिरत प्रदक्षिणा घालणे हे जर शुभ किंवा अशुभ नाही तर त्यावरून कल्पना केलेले काल (वेळ) विभाजन शुभ अथवा अशुभ असणे शक्यच नाही हे ध्यानात घ्यावे.

अशा प्रकारचे तारांगण यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड शहरामध्ये सर्व गोष्टींचा आम्ही पाठपुरावा करून निर्माण केलेली आहे.शाळेतील विद्यार्थ्यांना या तारांगणाचा शैक्षणिक जीवनात फायदा होईल. आणि ब्रह्मांडातील चंद्र,सूर्य,तारे याबद्दल अचूक माहिती मिळेल. म्हणून हा तारांगणाचे लोकार्पण सोहळा करून सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला.

अशी माहिती नितीन भुतडा यांनी दिली.या वेळी उमरखेड नगरीतील सन्मानित व प्रतिष्ठित नागरिक व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.