रिपाई ए च्या सातारा शहर युवक अध्यक्ष पदी सिद्धार्थ समिदंर यांच्या निवडीने निष्ठवंतांना मिळाला न्याय…..

137

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.3मार्च):-भारत देश व महाराष्ट्र राज्यात सध्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठींनी न्याय देणे दुरापास्त झाले आहेये. याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गट अपवाद ठरला आहे. सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली निष्ठापूर्वक काम करणारे युवा कार्यकर्ते सिद्धार्थ समिंदर यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा शहर युवा अध्यक्षपदी निवड झाली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटच्या सातारा जिल्हा कार्यालयात सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दुपारी एक वाजता झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या.
यावेळी सातारा शहर युवक अध्यक्ष पदी सिद्धार्थ समिदंर यांची निवड करण्यात आली. सामान्य कार्यकर्ता म्हणून सिद्धार्थ समिंदर यांनी अनेक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. नेते दादासाहेब ओव्हाळ यांच्या प्रत्येक निर्णया मागे ते सावलीप्रमाणे वागत आहेत.
प्रभू श्रीरामचंद्र यांचे एकनिष्ठ म्हणून स्वामी निष्ठावंत श्री हनुमान यांचे नाव काढले जाते.

त्याच पद्धतीने निष्ठापूर्वक काम करणारे सिद्धार्थ समिंदर यांनी कधीही पदाची अपेक्षा ठेवली नव्हती. परंतु ,त्यांच्या निष्ठेला सन्मान करण्यासाठी हे पद देण्यात आलेले आहे. राजकीय पक्षाचे पद मिळाले की कार्यकर्ता हा स्वतःला खूप मोठा समजत असतो. सामाजिक व राजकीय विस्तार होण्यापेक्षा व्यक्तिगत प्रसिद्धी व लेटर पॅड, व्हिजिटिंग कार्ड आणि वाहनावर लोगो एवढ्या पुरतेच काही राजकीय पक्षाची पदे मर्यादित राहतात. याला रिपब्लिकन पार्टी ए गट अपवाद आहे. प्रत्येक समाजातील व्यक्तीला न्याय मिळावा. यासाठी सातारा जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गट व त्यांचे कार्यकर्ते आदरणीय पक्षप्रमुख श्री दीपकभाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करत आहेत. आज झालेल्या या निवडीमुळे सर्वसामान्य निष्ठावंतांना न्याय मिळाल्याची भावना जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

सिद्धार्थ समिंदर यांचे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. विशेष बाब म्हणजे साताऱ्यातील ज्येष्ठ पत्रकार विशाल कदम, अजित जगताप, शिवाजी काळभोर, डॅनियल खुडे व गौरी आवळे तसेच पुरोगामी चळवळीतील विविध पक्षात सक्रिय सहभाग घेतलेल्या कार्यकर्त्यांनी मनापासून अभिनंदन केले आहे.यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी मदन खंकाळ, महिला आघाडी प्रमुख दामिनी निंबाळकर आणि सीमा जगताप, पूजा साळुंखे धनश्री भिसे अजून, सूरेश पवार, सुनील ओव्हाळ, राजू ओव्हाळ, नाना ओव्हाळ, राकेश जाधव, पप्पू जाधव, अल्ताफ शेख, किरण ओव्हाळ आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना रिपाई ए पक्षाची सातारा शहरात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भक्कम बांधणी करणार आहे. प्रत्येक वार्डात एक शाखा उभी करणार आहे .असे सिद्धार्थ समिदंर यांनी सांगितले.