ॲड.अप्पाराव मैंद यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

205

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.4मार्च):-महाराष्ट्र रत्न, धम्मभुषण पुरस्कार प्राप्त, जेष्ठ समाजसेवक,तथा चार्वांकवनाचे संस्थापक मा. ॲड.अप्पाराव मैंद यांना वयाची ८२वर्ष पुर्ण झाल्याबद्दल त्यांचा धम्मसंगिती ग्रुप चार्वांकवन मांडवा रोड पुसदच्या वतीने २मार्चला अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज कार्यकर्ते मा.प्रा.रामप्रसाद तौर, प्रमुख अतिथी म्हणून माजी सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती तथा सत्यशोधक समाज संभाजीनगरचे अध्यक्ष मा.के.ई.हरिदास, माजी जि.प.सद्दश्य शरदराव माहुरे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सोनोने, पंजाबराव खडकेकर, नारायणराव क्षिरसागर, प्रकाश गायकवाड, विकास जामकर, दिलीप रामटेके नागपुर, भिमराव भवरे मोहदी,एस.टी.भवरे, आनंद भगत उपस्थित होते.

सुरवातीला तथागत गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, महात्मा फुले, माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सुजाता महिला मंडळ ग्रिनपार्क श्रीरामपूर च्या उपासिकांनी बुद्ध वंदना घेतली.कमलेश पाटील व गजभिये यांनी अभिष्टचिंतनपर गित सादर केले.प्रमुख अतिथींच्या हस्ते ॲड.अप्पाराव मैंद साहेब यांचा शाल, पुष्पहार व केक कापून अभिष्टचिंतनपर सत्कार करण्यात आला.

पुसद शहरातील असंख्य नागरिकांनी व विविध संस्थांच्या वतीने मैंदसाहेब यांना अभिष्टचिंतनपर शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी गोवर्धन मोहिते, शरदराव माहुरे, बाळासाहेब सोनोने ,के.ई.हरिदास,प्रा.रामप्रसाद तौर यांची अभिष्टचिंतनपर भाषणे झालीत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वदिप महाबोधी विहार श्रीरामपूरचे अध्यक्ष साहेबराव गुजर यांनी तर आभारप्रदर्शन धम्मसंगिती ग्रुप चार्वांकवनाचे सद्दश्य संजय आसोले यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धम्मसंगिती ग्रुप चार्वांकवनाचे सर्व सभासदांनी सहकार्य केले.स्नेहभोजनाने कार्यक्रमांची सांगता झाली.