बंद शाळा इमारतीवर भुरट्या चोरांचा चोऱ्या सुरूच – पोलीसात तक्रार देऊनही पोलीसांचे दुर्लक्ष

269

✒️शार्दुल पचारे(प्रतिनिधी चिमूर)

चिमूर(दि.6मार्च):-शहरात व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढले असुन एक वेळची तलब भागविण्या करीता भुरट्या चोंरीचे प्रमाण वाढले आहे. अभ्यंकर मैदान जवळील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा (मूले ) यांचे ताब्यात असलेल्या जिल्हा परिषद कन्या माध्यमिक विद्यालयाच्या जुन्या इमारतीचे दरवाजे, लाकुड,फाटे, लाकडी साहीत्य, टिन, कपाटातील साहित्य चोरी गेल्याची तक्रार शाळे तर्फे चिमूर पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली. परंतु पोलिसात तक्रार दिल्यानंतरही संशईतावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.

चिमूर शहरातील शासकिय इमारती, शाळेतुनही भूरट्या चोऱ्या वाढलेल्या आहेत. चिमूर शहरातील सगळ्यात जुनी जिल्हा परिषद मुलीची केंद्रीय माध्यामिक शाळा विद्यार्थ्या अभावी बंद पडली. शाळेतील शिक्षकांचे इतर समायोजन करण्यात आले. इमारतीचा ताबा
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा (मूले ) यांचे कडे देण्यात आले. बंद असलेल्या निर्लेखित इमारतीत तथा वर्ग खोल्यात काही शैक्षणिक साहित्य तसेच लाकडी कपाटात ठेवण्यात आले. उपयोगात येऊ शकणारे साहित्य इता शाळाना शिक्षण विभागाने दिले नाही किंवा त्याची वरिष्ठांच्या सम्मत्तीने विक्री सुद्धा केली नाही.

बंद शाळा इमारतीना तसेच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा (मूले ) येथील इमारत साहित्य व इतर साहित्यावर भुरट्या चोरांची नजर गेली.आणि रोज काहीना काही चोरी सुरु झाली. यापुर्वीही शाळेत चोरी झाल्याची तक्रार देण्यात आली.जुनी सर्व इमारतच चोरी जाते की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक शाळेला लावलेला कुलुप तोडण्याचा प्रयत्न करण्यात आले आहे. चोरीची लेखी तक्रार मुख्याध्यापिका छाया खोब्रागडे तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीहरी सातपुते यांनी चिमूर पोलिस स्टेशनला दिली. तक्रार दिल्यानंतरही व त्यानंतर पोलिसांना चोरी झाल्यानंतरही पोलिस प्रशासनाने संशईत चोरांकडे दुर्लक्ष करीत आहे. भुरट्या चोरांवर पोलिस प्रशासण कसे नियंत्रण करतात याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.

पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शाळेत येऊन चौकशी केली. पण संशईत आरोपीची चौकशी केली नाही त्यानंतर ही शाळेत चोऱ्या होत गेल्या. चोरी झाल्याची माहिती फोन द्वारे व स्वतः जाऊन पोलिस स्टेशनला देण्यात आली. परंतु अजूनही कारवाही झाली नाही.
– श्रीहरी सातपुते
– अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती