विटा येथे गोल्डनसिटी चित्रपट महोत्सवाचे आयोजन- निर्माता, दिग्दर्शक दिलीप भोसले

91

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.7मार्च): – येथील सक्षम फिल्म कंपनी, वायू प्राँडक्शन हाऊस आणि नवजीवन संशोधन व विकास संस्था यांचे संयुक्त विद्यमाने विटा येथे प्रथमच ग्रामीण आणि शहरी भागातील लेखक, निर्माता, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, आणि कलाकार या सर्वांच्या सांघिक प्रयत्न आणि मेहनतीला न्याय देण्यासाठी, कोणाच्या भावना, कोणाचे करिअर, तर कुणाचे लाखो रुपये अडकलेल्या कलाकृती रसिक प्रेक्षकांच्या समोर आणून नवोदित कलाकारांच्या कलागुणांचे कौतुक करण्यासाठी गोल्डन सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चित्रपट, लघु चित्रपट, वेब सिरीज, अल्बम गीत यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देवून गौरवण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त कलाकारांनी आपल्या कलाकृती www.festival-giff.com या वेबसाईट वरती जावून सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

या चित्रपट महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ अनेक नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत 14 एप्रिल रोजी विटा येथे होणार आहे. अशी माहिती चित्रपट महोत्सवाचे संचालक लेखक निर्माते दिग्दर्शक दिलीप भोसले आणि लेखक दिग्दर्शक के. के. माने यांनी दिली.