खड्डाच रस्ता पोखरू लागला आहे

146

✒️सातारा-खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

सातारा(दि.7मार्च):-रस्त्यात खड्डे पडतात ही सर्वसामान्य बाब आहे मात्र खट्टा रस्त्याला पोखरू लागला आहे हे सातारा पंढरपूर रस्त्यावरील पुसेगाव वडूज मार्गावरील खटाव या तालुक्याच्या ठिकाणी कॉलेज चौकात राष्ट्रीय महामार्ग वर खट्टा रस्ता पोखारू लागल्याचे दिसून येत असून बरेच दिवस झाले तरी याकडे कोणाचेच लक्ष नाही. यामध्ये मोठी दुर्घटना होऊ शकते, त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

खटाव कोरेगाव तालुक्यातील रस्ते अगदी चकाचक झाले असून खटाव मधील कॉलेज चौकामध्ये मोठा ओढ्याचा खड्डा रस्त्याला फोडून चालला असून त्यात किरकोळ कचरा पडत आहे मात्र या ठिकाणी कोणत्याही गाडीचे चाक जाऊन मोठी दुर्घटना होऊ शकते.

त्यामुळे संबंधित विभागाने खटाव ग्रामपंचायत असो सार्वजनिक बांधकाम असो यांनी तातडीने याकडे लक्ष द्यावे याच महामार्गावरून साताऱ्याला जिल्ह्याच्या ठिकाणी जाणारी सर्व अधिकारी असतात कर्मचारी असतात लोकप्रतिनिधी असतात तरीदेखील त्यांना हा खड्डा दिसत नाही हे मात्र विशेष आहे.