कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी योग्य नियोजनपूर्ण मेहनतीला पर्याय नाही : जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे विविध क्षेत्रातील हिरकणींचा स्त्रीरत्न पुरस्काराने सन्मान

77

 

बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे,9075913114

कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी योग्य नियोजनपूर्ण मेहनतीला पर्याय नाही, असे मनोगत जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी व्यक्त केले.
येथील स.मा.गर्गे भवन येथे पत्रकार संघ, दैनिक सूर्योदय, दैनिक समर्थ राजयोग आणि आश्रय सेवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पूर्व संध्येला विविध क्षेत्रातील यशस्वी रणरागिणींचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ,शाल, श्रीफळ,पेन भेट देऊन गौरवण्यात आले. यावेळी. जिल्हाधिकारी बोलत होत्या.
कार्यक्रमाचे माॅं जिजाऊ, सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दिपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

त्या पुढे म्हणाले, आपल्या अपत्यांचे निरीक्षण करावे, त्यांना कुठल्या क्षेत्रात आवड आहे हे बघावे .आणि त्यांच्या त्या आवडी निवडीप्रमाणे त्यांना करिअर देण्यासाठी त्यांच्यासोबत मेहनत करावी. क्रीडा क्षेत्रात जाण्यासाठी त्यांच्यासोबत पालकांनी मैदानावर जावे. त्यांना वाचण्याची लिहिण्याची आवड असल्यास त्यांना चांगली पुस्तके द्यावी, त्यांच्या कडून सोबत बसून ती वाचून घ्यावी. बदलत्या काळात संसाधने आणि तंत्रज्ञान विकास झाल्यामुळे आजची मुले अधिक वेळ मोबाईलवर राहून सर्व काही गुगलवर शोधातात परंतु, त्यामुळे बुद्धीचा किती विकास होतो हे सांगणे कठीण आहे.

पालकांनी देखील आपल्या पाल्याचा बुद्धांक किती आहे ? हे तपासले पाहिजे. उगीच आपल्या इच्छा त्यांचावर लादू नये. म मुलं मुलीआवडेल त्या क्षेत्रात प्रगती करू शकतो. मुलांना फक्त प्रामाणिकपणे मेहनत करायची आहे ती त्यांनी करावी आणि यशस्वी व्हावे असा मौलिक सल्ला त्यांनी यावेळी दिला.

जिल्हाधिकारी यांनी स्वतःचा अनुभव सांगत आठव्या वर्गापर्यंत डॉक्टर असल्याचे स्वप्न नववीत आल्यावर आयएएस बनावे असे निश्चित केले आणि नियोजपूर्वक अभ्यासला लागल्या. पदवी झाल्यानंतर दिल्लीमध्ये अभ्यासाला असताना केवळ चार तास झोपत असत आणि दुपारी जर डुलकी घ्यायची असली तर खुर्चीवर बसून घेत असतं कारण नियोजन केल्याशिवाय भारतीय लोकसेवा आयोगाची सर्वात वरची म्हणजे आयएएस ची परीक्षा पास होता येत नाही अशी माहिती देत. त्यांनी त्यांचा प्रवास सांगितला.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या आयोजकांचे अभिनंदन करत या ठिकाणी विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा स्त्री रत्न पुरस्कार देऊन सन्मान केला.

याप्रसंगी सौ संध्या बारगजे, शेख शाकेरा, शैलाताई मुसळे, शिक्षिका मनीषा मुंडे, पत्रकार गीतांजली लव्हाळे, सविता कुलकर्णी या सत्कारमूर्तींनी प्रातिनिधीक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला जिल्हाभरातून महिला, मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव स्वामी यांनी केले तर आभार कार्यक्रमाच्या आयोजक पत्रकार शेख आयेशा यांनी मानले. या बहारदार कार्यक्रमाचा समारोप अल्पोपहाराने झाला.

जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी संगीतादेवी पाटील, जिल्हा माहिती कार्यालयातील प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी अंजू निमसरकर कांबळे, बीडच्या पहिल्या पोक्सोच्या विशेष सरकारी वकील अँड मंजुषा दराडे मुंडे त्याचबरोबर ब्रह्मकुमारी प्रज्ञाबहण दिदीजी, सौ स्मिता चंद्रकांत नवले, सौ संध्या बारगजे, डॉक्टर उर्मिला घोडके दैनिक दिव्य लोकप्रभाचे संपादक संतोष मानूरकर दैनिक सूर्योदयचे संपादक गंगाधर नाना काळकुटे युवा नेते चंद्रकांत नवले,दैनिक समर्थ राजयोगचे संपादक वैभव स्वामी प्रसिद्ध मुळव्याध तज्ञ डॉक्टर रमेश घोडके समाज रत्न गोवर्धन दराडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभले तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्री मुंडे दिव्य प्रभाती संपादक श्री मानूरकर, दैनिक सूर्योदय संपादक श्री काळकुटे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या सूचनेवरून बालविवाह करणार नाही ,अशी शपथ बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील यांनी उपस्थितांना देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.