वीजबिल माफ व्हावे यासाठी ऊर्जामंत्र्यांच्या घराला घेराव

41

🔺क्रांतीदिनी आप चे कार्यकर्ते जेलबंद

🔺प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या घरासमोर घेराव

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.9ऑगस्ट):-संचारबंधी काळातील जनतेचे संपूर्ण वीजबिल माफ करावे यासाठी आम आदमी पार्टी तर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून आज दि. ९ आगस्ट रोजी क्रांतिदिनाचे औचित्य साधून राज्यभर आंदोलनाचा ईशारा दिला होता. राज्यभर आम आदमी पार्टी तर्फे प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या घरासमोर घेराव घालून निदर्शने देण्यात आली.

नागपूर येथे उर्जामंत्री मा. श्री. नितीनजी राउत यांच्या निवासस्थानी आम आदमी पार्टी चे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळी १०.३० वाजतापासून संचारबंधीचे सर्व नियम पाळत भर पावसात शांतपणे वीजबिल माफ करण्यासाठी निदर्शने देत होते. ऊर्जामंत्र्यांनी निवेदन स्वीकारण्यास तसेच भेटण्यास मनाई केल्यानंतर आम आदमी पार्टी च्या कार्यकर्त्यांनी वीजबिल माफ करण्यासाठी घोषणा देण्यास सुरुवात करताच उर्जामंत्री श्री नितीनजी राउत यांच्या आदेशानुसार आप च्या सर्वे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक करून जरीपटका पोलीस स्टेशन येथे जेलबंद करण्यात आले.

   अटक करण्यात आलेल्यांमध्ये आम आदमी पार्टी चे विदर्भ संयोजक डॉ. देवेंद्र वानखेडे, जगजीत सिह, कविता सिंघल, अंबरीश सावरकर, अशोक मिश्रा, निलेश गोयल, डॉ. अजय पिसे, अहमद अली, अब्दुल साहीद, आकाश काळे, जय चव्हाण, मनोज डफरे, सचिन पारधी, प्रभात अग्रवाल, अब्दुल शेख, मोहम्मद रियाज, रोशन डोंगरे, नेहाल बारेवार, गजानन बिरे, चंद्रकांत ढोबळे, नंदू पाल, सुशांत बोरकर, सचिन लोणकर व इतर अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.