चिमुर पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्याला केली अटक – 42 हजार 400 रुपयांचे मुद्देमाल जप्त

30

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.17ऑगस्ट):-पोलीस स्टेशन चिमुरला मिळालेल्या गीपनिय माहितीचा आधारावर अवैध दारूसाठा धाड टाकून चिमुर येथील गांधी वार्डातील दिनेश वामन वानखेडे याला अटक केली.

आज रोजी Api मंगेश मोहोड व पोलीस कर्मचारी प्रमोद गुट्टे पोस्टे परिसरात पेट्रोलींग करत असताना मुखबीर कडुन मिळालेल्या खाञीशीर माहितीवरून नामे दिनेश वामन वानखेडे वय 39 वर्ष रा गांधी वार्ड चीमुर याचे घरी दारु संबंधाने कारवाई केली आसता.4 खर्डा खोक्यात एकुण 192 नग व एका पिशवीत 20 नग अशा एकुण 212 नग कोकण देशी दारुच्या शिशा मिळाल्या.

एकुण किंमत 42400 रु असा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी दिनेश वामन वानखेडे रा गांधी वार्ड चीमुर यास अटक करण्यात आली. सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी श्री तारे साहेब, पोनि स्वप्निल धुळे सा यांचे मार्गदर्शनात Api मंगेश मोहोड पोलीस कर्मचारी प्रमोद गुट्टे, शरीफ शेख यांनी केली.