गणेश मूर्ती साकारण्याचे काम शेवट टप्प्यावर- इको फ्रेंडली गणेश मूर्तींना मागणीत वाढ

38

✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

सातारा(दि.21ऑगस्ट):-गणेश उत्सव या सणाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. हिंदुधर्मीयांचे आराध्यदेवता श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करतात ,पण या वर्षी कोरोना आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून आपल्याला गणेश उत्सव शांत आणि श्रद्धापूर्वक साजरा करायचाआहे.

शासनाने दिलेल्या नियमानुसार घरगुती गणेशमूर्ती ३ फूट आणि मंडळाची मूर्ती ४ फूट पेक्षा जास्त नसावी. आगमनापुर्वीपासुनच कितीतरी दिवस आधीपासुन सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते मूर्ती बनवण्यासाठी गर्दी करत होते पण या वेळेस सर्वत्र कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांचे वार्षिक आर्थिक नियोजनही कोलमडले आहे.

घरगुती गणेशमूर्तींसाठी शाडूच्या मूर्तींना जास्त प्रमाणात मागणी केली जात आहे.तसेच या वर्षी जास्तीत जास्त भर इको फ्रेंडली गणेश मूर्तींना दिला आहे असेही या वेळेस सांगताना प्रसिद्ध मूर्तिकार पोपट कुंभार म्हणाले.