फेसबुकवर शेवटची पोस्ट टाकून शेतकर्‍याची आत्महत्या

27

✒️नवनाथ आडे( गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

बीड(दि.24ऑगस्ट):- जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. दरवर्षी जिल्ह्यात दोनशे पेक्षा जास्त शेतकरी कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून मृत्युला कवटाळतात. गेवराई तालुक्यातील अगरनांदूर येथील ३८ वर्षीय शेतकर्‍याने फेसबुकवर पोस्ट टाकत आत्महत्या केली. मी काशीनाथ त्रिंबक आरेकर सर्व नातेवाईकांना, मित्रमंडळींना शेवटचं’अशा पध्दतीची पोस्ट टाकून आत्महत्या केली. घटनास्थळी गेवराई पोलीसांनी धाव घेवून पंचनामा केला. हा शेतकरी अल्पभुधारक होता. सरकारने कर्ज माफीचा निर्णय घेतलेला आहे. मात्र तरीही शेतकरी आत्महत्या सुरूच आहे. सर्वात जास्त आत्महत्या ह्या मराठवाड्यात होतात. मयत ’काशीनाथ त्रिंबक आरेकर याने घराच्या बाजुला असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी ६ वाजता समोर आला.घटनेची माहिती गेवराई पोलीसांना झाल्यानंतर एएसआय फड आणि पोलीस कॉन्स्टेबल तळेकर यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.