घरफोडी करुन चोरटे पसार रोख रक्कमेसह दागिने लंपास

13

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:- 9075913114

गेवराई(दि.24ऑगस्ट):-तालूक्यातील तळणेवाडी येथुन जवळच असलेल्या तळेवस्ती (गणेशनगर) येथे दि.२३ ऑगस्ट रविवारी मध्यरात्री एकाच रात्री कूलूप तोडून चोरट्यांनी घरात तीन शेतकऱ्यांच्या घरात प्रवेश करत रोख रक्कमेसह घरातील दागीने घेवून चोरटे पसार झाल्याची घटनातीन वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत गेवराई पोलीस स्टेशनला माहीती कळवल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

घटनेचा पंचनाम केला. याबाबत सविस्तर वृत्त असे की तळणेवाडी येथील शेतकरी लक्ष्मण रसाळ यांच्या घरामधील रोख ऐंशी हजार व बारा ग्रामचे नैकलस ‘एक तोळ्याचे बोरमाळ असा ऐवज चोरट्यानी लंपास केला. तर याच परीसरात अवधुत यादव यांच्या घराशेजारी एका अंब्याच्या झाडाचा साहारा घेवून चोरटे जिन्याखाली उतरून घरामध्ये प्रवेश केला व घरामध्ये असलेले कपाट पेटी उचलुन घेऊन बाहेर नेऊन आतमध्ये काही सापडते का ते पाहीले पण त्यामध्ये नुसते कपडयाशिवाय दुसरे काहीच मिळाले नाही. तेथुन जवळच असलेले लक्ष्मण धस यांच्या घराकडे चोरट्यांनी मोर्चा वळवला. त्यांना मात्र अंगावरच्या खिशात हजार पाचशे रुपये चोरट्यांनी नेले असल्याचे सांगितले ही घटना मध्यरात्री घडल्याने रात्रीच्या वेळेस अवधुत यादव हे लघुशंकेसाठी उठले असता आपल्या घरामध्ये चोरी झाल्याचे लक्षात आले. परंतू रात्रीचा फायदा घेऊन चोरटे घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेचा पुढील तपास गेवराई पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ व त्यांचे सहकारी करत आहेत.