चंद्रपूर जिल्ह्यात आज (दि.27ऑगस्ट) रोजी 24 तासात कोरोना आजारामुळे दोघांचा मृत्यू तर आजची कोरोना बाधितांची संख्या 132

20

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.27ऑगस्ट):-जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना आजारामुळे 22 मृत्यू झाले आहेत. यात गेल्या 24 तासातील दोन मृत्यूचा समावेश आहे. आज बल्लारपूर येथील मौलाना आझाद वार्डातील 52 वर्षीय पुरुष बधितांचा मृत्यू झाला आहे. त्याला 24 ऑगस्टला भर्ती करण्यात आले होते. त्याचा मृत्यू 26 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झाला.

चंद्रपूर येथील पठाणपुरा वार्डातील 60 वर्षीय बधितांचा आज 27 ऑगस्टचा पहाटे 1.30 वाजता मृत्यू झाला.

आज सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात 132 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील बाधितांची 1799 झाली आहे.