सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग उभारणी कार्यशाळा

27

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.28ऑगस्ट):- महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र चंद्रपूर द्वारे 10 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक / युवतींकरीता दि. 5 सप्टेंबर रोजी 1 दिवसीय कालावधीचे ऑनलाईन सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग उभारणी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील युवक युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदर प्रशिक्षणामध्ये व्यवसाय उद्योजकांशी चर्चा लघु उद्योग, व्यवसाय शासकीय व्याख्या व नोंदणी पद्धती, आयात निर्यात उद्योग संधी, बाजारपेठ पाहणी, प्रकल्प अहवाल तयार करणे, डिजिटल मार्केटिंग, लघुउद्योगांसाठी व व्यवसायासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती व अनुदान, सिडबी तर्फे योजना व अनुदान, लघुउद्योग प्रोडक्ट मार्केटिंग इत्यादी विषयांवर विशेष तज्ञ व शासकिय अधिकारी वर्गाद्ववारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छूक युवक युवतींनी त्वरीत दि. 04 सप्टेंबर पर्यंत अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के.व्ही. राठोड, मो.न. 9403078773, 07172-274416 व कार्यक्रम आयोजक लक्ष्मी खोब्रागडे, मो. नं. 9309574045 यांच्याशी संपर्क साधावा.