कुंडलवाडी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष कुडमुलवार यांच्यावरील अविश्वास ठराव बहुमताने मंजूर

35

🔸उपाध्यक्ष विठ्ठल कुडमुलवार अखेर पदावरून पायउतार

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

कुंडलवाडी(दि.26जानेवारी):-कुंडलवाडी नगरपरिषदेतील भाजपचे उपाध्यक्ष विठ्ठल कुडमुलवार यांच्यावर आणलेला अविश्वास ठराव आज दि.२५ जानेवारी रोजी नगरपरिषदेत झालेल्या विशेष सभेत बहुमताने मंजूर झाले असल्याची माहिती विशेष सभेचे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार यांनी ‘दै.सत्यप्रभा’शी बोलताना दिली. कुंडलवाडी नगरपरिषदेत चार वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत येथील नागरिकांनी भारतीय जनता पक्षाला बहुमत देत सत्ता दिली. यानंतर भाजपच्या नगराध्यक्षा अरूणा कुडमुलवार यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याच्या कारणावरून नगरविकास विभागाने अपात्र ठरविले.

यानंतर नगरपरिषदेत चार महिन्यापुर्वी भाजप सत्तेतून पायउतार झाल्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता आली.त्यानंतर भाजपचे उपनगराध्यक्ष विठ्ठल कुडमुलवार यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचालींना वेग आला होता. महाविकास आघाडीकडे आवश्यक तेवढे संख्याबळ असल्याने उपाध्यक्ष कुडमुलवार यांच्यावर अविश्वास ठराव आणुन तो ठराव मंजुरीसाठी २५ जानेवारी रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. भाजपच्या सत्ताधारी नेतृत्व व उपाध्यक्ष यांच्या मनमानी व एकाधिकारशाही पणाला कंटाळून अविश्वास ठराव आणण्यासाठी भाजपमधील ६ नगरसेवकांनी महाविकास आघाडीला नगराध्यक्ष निवडणुकीत व उपाध्यक्ष यांच्यावरील अविश्वास ठरावावेळी मदत केली.

आज झालेल्या अविश्वास ठराव मंजुरीसाठी बोलविण्यात आलेल्या विशेष सभेत गणपुर्तीसाठी आवश्यक असलेल्या संख्याबळ होते.हा ठराव बहुमताने मंजूर झाला असून पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार यांच्या आदेशान्वये मुख्याधिकारी जी.एम.इरलोड यांनी जाहीर केले. हा अविश्वास ठरावावेळी १२ सदस्य उपस्थित होते.तर ५ सदस्य गैरहजर होते.हा ठराव १२ विरूद्ध ० मतांने मंजूर झाला.विशेष म्हणजे उपाध्यक्ष विठ्ठल कुडमुलवार व त्यांचे सहयोगी सदस्य अविश्वास प्रस्तावाला सामोरे न जाता सपशेल माघार घेत सभेस अनुपस्थिती दर्शविली.आता महाविकास आघाडीकडे संख्याबळ आसल्याने पुढील काळात महाविकास आघाडीचा उपाध्यक्ष होणार असुन कोण उपाध्यक्ष होणार ? हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार, नगरसेवक सुरेश कोंडावार,शंकर अण्णा गोनेलवार,शैलेश -याकावार, सचिन कोटलावार, मुख्तार शेख,नंदाबाई कांबळे,वीणा कोटलावार,गंगाबाई भास्कर, सावित्राबाई पडकुटलावार,शकुंतलाबाई खेळगे,प्रयाबाई शिरामे,यांच्यासह महाविकास आघाडीचे माजी नगराध्यक्ष डॉ. एस.एस.शेंगूलवार,काँग्रेस शहराध्यक्ष प्रदिप अंबेकर, माजी नगरसेवक राजु पोतनकर, नरेंद्र जिठ्ठावार, पोशट्टी पडकुटलावार,गंगाधरराव खेळगे,संजय भास्कर,श्रीनिवास जिठ्ठावार,नरेश सब्बनवार,सयाराम नामतेष,साईनाथ दाचावार, भीम पोतनकर, सिराज पट्टेदार,संजय पाटील खुळगे,,रमेश करपे,मियाँभाई खुरेशी यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.भाजपच्या उपनगराध्यक्ष विठ्ठल कुडमुलवार यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर महाविकास आघाडीकडुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.