हणेगाव ग्रामपंचायत येथे महात्मा फुले जयंती साजरी

29
✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

हणेगाव(दि.12एप्रिल):- हणेगाव ग्रामपंचायत येथे महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे व सत्यशोधक समाजाचे विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.

 महात्मा ज्योतिबा फूले यांच्या जयंती सोबतच देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना महामारीने दि.९/४/२०२१ रोजी निधन झाल्याने त्यांच्या आत्म्यास शांती मिळविण्यासाठी पाच मिनिटे मौन पाळले.
यावेळी ग्राम पंचायत उपसरपंच मुजिबोदिन चमकुडे,ग्राम पंचायत सदस्य विवेक पडकंठवार,ग्रा.पं.कर्मचारी माधव नामेवार,रामदास बैलवाड,अहेमद अतार यांनी यावेळी सामाजिक अंतर ठेवून व मास्क,सॕनिटायझरचा वापर करून जयंती साजरी करण्यात आली.