पोलीसांची ड्युटी आठ तासांची करा – सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांची मागणी

37

✒️अशोक हाके(नांदेड प्रतिनिधी)

नांदेड(दि.10सप्टेंबर):- महाराष्ट्र पोलीस खात्यातील पोलीस अधिकारी ,कर्मचारी व पोलीस दलातील महीला अधिकारी कर्मचारी वर्ग अतिशय कर्तव्यदक्ष – प्रामाणिकपणे आपल्या जीवाची कुठलीही पर्वा न करता कर्तव्य बजावत असतात, त्यांना कुटुंबासोबत कुठलीही सण असो किंवा इतर काही त्यांना स्वतःच्या कुटुंबासाठी सुख सुखांच्या वेळीही स्वतःचा आपला वेळ देऊ शकत नसत नाहीत, कारण त्यांना २४ तास जनसेवेसाठी सज्ज राहावे लागते, पोलीस दलातील अधिकार्‍यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत कर्तव्यनिष्ठ असतात, यासह कर्तव्यदक्ष भूमिकाही बजावत असतात.

मी सामाजिक कार्यकर्ता असल्याने, अनेक वेळा पोलीस बांधवांसोबत संपर्क – संबंध आला आहे, माझ्या मनामध्ये पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी व‌ कर्मचारी व महीला अधिकारी कर्मचाऱ्यांबद्दल खुप आदर आहे, पोलीसांनी जनतेला दिवस-रात्र तत्पर सेवा मिळावी म्हणून त्यांनी अनेक पथकही स्थापन केली आहेत, उदा.. महीलासाठी दामिनी, जेष्ठ नागरिकांसाठी, लहान मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, वाहतुकीसाठी, तसेच सतर्क अश्या विविध अनेक जनतेच्या सेवेसाठी सेवा चालू केले आहेत, पोलीस बांधव २४ तास इतके प्रामाणिकपणे काम करीत असताना सुध्दा समाजातली काही लोक पोलीसांकडे अतिशय संशयी नजरेने पाहत असतात, समाजातील अश्या लोकांनी पोलीसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, अतीताणामुळे पोलीसांचे मानसिक आरोग्य- बिघडत असते, त्यांना कुटुंबीयांना ज्यास्त वेळ देता येत नाही.

त्यामुळे पोलिसांची ड्युटी आठ तासांची असावी म्हणजे ते आपल्या मुलाबाळांना – कुटूंबियांना वेळ देतील आणि त्यांचे कुटुंब आनंदी राहील. यासह वाहतूक पोलीस चौकीत किंवा शहरातील विविध ठिकाणी वाहतूक कंट्रोल करण्यासाठी दिवसभर उभे असतात त्यामध्ये महीला पोलीस भगिनी पण असतात, तर त्यांना त्याठिकाणी बसण्यासाठी खुर्ची आणि पिण्यासाठी पाण्याची सोय असावी. आज पोलीसांमुळेच जनता सुरक्षित आणि सुखरूप आहे, पण पोलीसच असुरक्षित आहेत. त्यामुळे पोलीसांची ड्युटी आठ तासांची असावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते- शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगावकर यांनी प्रशिध्दीपत्रकातून केली आहे, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,आणि गृहमंत्री यांना पोलिसांच्या प्रश्नांविषयी संविधानीक निवेदन देणार असल्याचेही शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहेत,