प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे अनेक पत्रकार कोविड योद्धांने सन्मानित

30

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(जिवती प्रतिनिधी)

जिवती(दि.18सप्टेंबर):- कोरोना काळात पत्रकारांनी केलेली अतुलनीय कामगिरी आणि घरी असलेल्या जनतेला सखोल बातमी पोहोचविण्याचे काम अहोरात्र केले, करोना काळात लागलेल्या लॉकडाऊन काळात बातम्यामुळे अनेकांचा जीव वाचला, प्रत्येकजन कधी ॲम्बुलससाठी तर काही ऑक्सिजनसाठी तर कधी इंजेक्शनसाठी पत्रकारांना फोन करत असत. आता परिस्थिती निवळली आता अशा या कोरोनाकाळात मदतीस धावणारा आपला हक्काचा माणूस पत्रकार यास सन्मानित करण्याचा नाशिकचे नगरसेवक बबलू सिंह परदेशी यांनी निर्णय घेतला आणि पिंपळ चौक कला व क्रीडा मंडळ नाशिक येथे सोहळा आयोजित करून सन्मानित केले.

गणेश उत्सव २०२१ अंतर्गत नाशिक भद्रकाली, पिंपळ चौक येथील नेते बबलूसिंह परदेशी व श्री सेवा पिंपळ चौक कला व क्रिडा गणेश उत्सव मंडळ यांच्या वतीने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघातील पत्रकारांना कोरोना योद्धा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. प्रथमता सर्व पत्रकारांच्या हस्ते गणरायाची आरती करत जयघोष करण्यात आला.

यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बबलूसिंह परदेशी, गणेश उत्सव मंडळ अध्यक्ष राजेंद्र केदारे, मार्गदर्शक अरुण परिवाल, नंदू चिंचोळकर, कैलास शिरसाठ, नीलम शिंदे, सचिन परमाणे, दुषण बागुल, हेमराज परिवाल, विलास दिवटे, अरुण मंडले, मदन मुंदडा, प्रभू महाराज यांच्या वतीने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गोसावी, सरचिटणीस जितेंद्र साठे, संघटक मनोहर भावनाथ, महिलाध्यक्षा प्रिया जैन, उपाध्यक्ष दिलीप बोरसे, सहसंघटक रंजन कदम, कार्याध्यक्ष सुनील खरे, सह प्रसिद्धी प्रमुख प्रदीप पाटील, मार्गदर्शक सुरेश भोर, कोषाध्यक्ष शरदचंद्र खैरणार, सदस्य दिलीप जोशी, रवींद्र साठे, नाशिक रोड विभागीय उपाध्यक्ष अनिल केदारे, सदस्य तथा स्टार लोकशक्ती संपादक रणजित झापर्डे यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सन्मानाबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, राज्य पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी, सर्व जिल्हा व तालुकाध्य आणि सभासदांनी कोविड योद्धांचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रीया- बबलूसिंह परदेशी, श्री सेवा पिंपळ चौक कला व क्रीडा मंडळ संस्थापक अध्यक्ष– नाशिक मधील पत्रकारांनी covid-19 आपत्तीमध्ये गेले दोन वर्ष आपल्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी, देशासाठी, नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र केलेल्या कार्याबद्दल कोविड योद्धा म्हणून प्रमाणपत्र, शाल श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन त्यांचा गौरव करत त्यांचे अभिनंदन व सत्कार आमच्या वतीने करण्यात आला. तसेच मंडळाच्या गणरायाच्या आरतीचा मान सर्व पत्रकारांना देण्यात आला.