ज्योती बोडणे मृत्यू प्रकरणात दोषी डॉक्टरावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा

34

🔹आई विना पोरक्या चिमुकल्या जीवांना न्याय मिळवून देण्यासाठी विनोद शर्मा याचं पुढाकार

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.11ऑक्टोबर): – सौ. ज्योती संतोष बोडणे रा. तळोधी बाळापूर येथील ही महिला रहिवाशी असून या महिलेचे आईचे गाव नेरी असल्याने चिमूर येथे उपजिल्हा रुग्णालयात होत असलेल्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करतांना मध्ये वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोपाल भगत व स्त्री रोगतज्ञ डॉ. वैशाली सरांगे यांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यु झाल्यामुळे दोषी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी युवा क्रांति संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

काही दिवसां पूर्वी चिमूर युवा क्रांति संघटनेच्या कार्यालयात आलेल्या तक्रारीनुसार सो. ज्योती संतोष बोडणे या महिलेचा उपजिल्हा रुग्णालय चिमुर येथे दिनांक २८/०२/२०२१ ला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरा अंतर्गत सकाळी १०.०० वाजता शस्त्रक्रिया प्रक्रिया सुरु झाली. त्यानंतर ११ वाजता ऑपरेशन रुममधुन तिला वार्डमध्ये शिष्ट करण्यात आले. दुपारनंतर तिला उलटी होणे, मळमळ वाटणे व तिचे पोट फुगले होते. सदर महिलेच्या प्रकृतीबाबत तिच्या कुटुंबियांनी डॉक्टरांना माहिती दिली होती. परंतु डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर दिनांक २९/०९/२०२१ रोजी सदर महिलेची प्रकृती जास्त खालावत गेली होती. शस्त्रक्रिया करणारी डॉ. वैशाली सरांगे यांनी तपासणी असता डॉक्टरांनी सदर महिलेची प्रकृत नॉर्मल असल्याचे सांगितले. परंतु दिनांक ३०/०९/२०२१ रोजी सौ. ज्योती बीडणे या महिलेचे पोट फुगत असुन नास त्रास वाढलेला होता. प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोपाल भगत यांनी चंद्रपूरला हलविण्याबाबत सांगितले. तेव्हा महिलेच्या कुटुंबियांनी पुढील उपचाराकरीता सौ. ज्योती बोडणे हिला चंद्रपूरला जिल्हा रुग्णालयात घेवून गेले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी पुन्हा शस्त्रक्रिया करून तिला आयसीयु मध्ये भरती ठेवले. त्यानंतर त्याच दिवशी रात्री १० वाजता तेथील डॉक्टरांनी सदर महिलेला मृत घोषीत केले.

सदर प्रकरणातील सौ. ज्योती संतोष बोडणे रा. नेरी या महिलेचे कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करतांना वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोपाल भगत व स्त्री रोगतज्ञ डॉ. वैशाली सरागे यांच्या निष्काळजीपणामुळे शस्त्रक्रिया कस्तांना चुकीची नस कापल्यामुळे सदर महिलेला असह्य त्रास सहन करावा लागला व त्यातच सदर महिलेचा मृत्यु झाल्यामुळे दोषी डॉक्टरांबर मनुष्यबद्याचा गुन्हा दाखल करावा यासाठी चिमूर युवा क्रांति संघटने तर्फे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,याना मार्फत उपविभागीय अधिकारी, कार्यालय चिमुर निवेदन दिले.सदर प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी न झाल्यास संघटनेचे मार्फत तीव्र आंदोलने छेडण्यात येईल या आंदोलना मुळे शांतता सुव्यवस्था भग झाल्यास या बाबतची जवाबदारी शासन व प्रशासनाची राहील असे निवेदन देताना विनोद शर्मा यांनी पत्रकाराना सागितले.