उमरखेड येथे 65 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सध्या पद्धतीने साजरा

49

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.15ऑक्टोबर):-शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड मध्ये 65 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात जगाला शांतीचा संदेश देणारे महाकरूणिक तथागत भगवान बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व अभिवादन करून सुरू करण्यात आला.65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दीना निमित्ताने पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भदंत कीर्ती बोधी, शंकरराव दिवेकर, हिराबाई दिवेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे मार्गदर्शक कुमार केंद्रेकर (अध्यक्ष शांतिदुत समिती,उमरखेड) व सिध्दार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड) यांनी धम्मचक्र प्रवर्तण दिनाचे महत्व सांगून अमूल्य मार्गदर्शन केले.तसेच वार्ड मध्ये घेण्यात आलेल्या डान्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धातील सर्वच स्पर्धकांना कालकथित संजय केंद्रेकर यांच्या प्रित्यर्थ कुमार केंद्रेकर यांनी विविध प्रकारचे बक्षिसे देऊन त्याचा सत्कार केला.

यावेळी जिजाबाई दिवेकर, भारताबाई दिवेकर, जाणकाबाई इंगोले, यशोदाबाई दिवेकर, ज्योतीताई इंगोले, उषाताई इंगोले, आनंदाबाई दिवेकर, सुभद्राबाई पाईकराव, शांताबाई दिवेकर, यशोधरा धबाले, दिगंबर श्रवले, मारोतीराव दिवेकर, भीमराव गवंदे, भीमराव श्रवले, दीपक इंगोले, गौतम दिवेकर,तुषार पाईकराव, बुध्दभुषण इंगोले असे तरुण मंडळी व अनके बालक बालिका उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय दिवेकर उमरखेड) तर आभार प्रफुल दिवेकर यांनी मानले.